□ हिवाळी अधिवेशनामध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केली शंका
सोलापूर : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम बंद असल्याबाबत आवाज उठवला आहे. मागील पाच वर्षापासून या प्रकल्पाचे वारंवार टेंडर काढून टक्केवारीचे राजकारण चालू असल्याची शंका त्यांनी व्यक्त करत त्वरित हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. Praniti Shinde Deshmukh has doubts about the percentage politics in the work of Solapur double aqueduct
आ. शिंदे म्हणाल्या, स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध विकास कामे हाती घेण्यात आलेले आहेत. त्यातील प्रामुख्याने महत्त्वाचे काम सोलापूर ते उजनी दुहेरी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे आहे. परंतु मागील पाच वर्षापासून या प्रकल्पाचे वारंवार टेंडर काढून टक्केवारीचे राजकारण चालू असल्याची बाब समोर येत आहे.
हा प्रकल्प सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असल्या कारणाने त्याचे काम लवकर होणे क्रम प्राप्त आहे. पण तसे न होता यामध्ये वर्क ऑर्डर दिल्यानंतरही काम करणाऱ्या कंपनीस हेतू पुरस्कार पाईपलाईनचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता कोणतेही वैद्य कारण प्रशासनाकडे नाही तसेच याकरिता कोणतीही न्यायालयीन स्थगिती नाही. ही बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी यांना पिण्याच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विकास कामे करण्याकरीता रस्ता खोदण्यात येतो, परंतु दुरुस्त करण्यात येत नाही. यामुळे शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
झोपडपट्टी भागामध्ये सार्वजनिक नळ बंद करण्याची मोहीम मागे घ्यावी, नवीन नळ कनेक्शन सामूहिक रित्या देण्याबाबत कोटेशन रकमेमध्ये हफ्ते पाडून द्यावेत, रेल्वेच्या जमिनीवर ज्या झोपडपट्टी आहेत त्यांना अधिकृत करण्याकरीता एक धोरणात्मक निर्णय घ्यावा, या भागातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली आहे.
शासनाने रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्या जागेवर किंवा पर्यायी जागेवर करावे, अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत ड्रेनेज लाईन खराब झाली आहे. त्याच्या दुरुस्तसाठी महापालिकेला खासबाब म्हणून निधी द्यावा, आदी मागण्याही आ. शिंदे यांनी केल्या.
● विमानतळासाठी राजकारण नको, बोरामणीसाठी प्रयत्न हवे
सोलापूर शहरातील ज्वलंत प्रश्न बोरामणी विमानतळाचा आहे. बोरामणी विमानतळाकरीता आपण राजकरण न करता सोलापुरामध्ये विमानतळ झाले पाहिजे, बोरामणी विमानतळ पूर्णपणे अधिकृतरित्या झालेले आहे. सगळे मिळून बोरामणी विमानतळाकरीता मा. ज्योतीरादित्या सिंधीया यांच्याकडे जावून लवकरात लवकर विमानतळ विकसित होऊन कार्यरत होण्याकरिता प्रयत्न करावे, असेही आ. शिंदे यांनी म्हटले आहे.
□ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आ. शिंदे
समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा असून तो तातडीने पूर्ण केला पाहिजे. हे काम सुरू करावे, याबाबत आपण अधिवेशनात बोलणार आहोत, असे आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या. या जलवाहिनीचे काम थांबविण्याकरीता कोणत्याही न्यायालयाने स्थगिती अथवा सूचना दिलेल्या नसल्याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे काम थांबविण्याची गरज नसताना देखील वेळकाढूपणा चालू आहे. काम थांबविणे म्हणजे शहराच्या विकासाकामांमध्ये अडथळा आणला जात आहे. आता अधिवेशन सुरू झाले आहे, आपण याप्रश्नी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे आ. शिंदे म्हणाल्या.
□ दुहेरी जलवाहिनीचे काम होणे गरजेचे, आवाज उठवू : आमदार देशमुख
सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता आवश्यक असलेल्या उजनी ते सोलापूर (दुहेरी) समांतर जलवाहिनीचे काम थांबविले आहे. हे काम कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याबाबत आपण चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरकरांना दोन, तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मुळात ही योजना भाजपच्या काळात मंजूर झाली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. याबाबत आपण नागापूर अधिवेशनात निश्चित आवाज उठवणार असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.