□ १ जानेवारीपासून सी. के. नायडू चषक महाराष्ट्र विरूद्ध गोवा होणार सामना
सोलापूर : सोलापूरचे नुतनीकरणातून सुसज्ज झालेल्या पार्क मैदानावर भारतरत्न, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडूलकर खेळणार असल्याची माहिती आहे. तसे पत्रव्यवहार होत आहेत. Will master blaster Sachinputra Arjun Tendulkar play at the park ground of Solapur?
नवीन वर्षात म्हणजे १ जानेवारीपासून सोलापुरात सी. के. नायडू चषक महाराष्ट्र विरूद्ध गोवा सामना होणार आहे. सोलापूर शहरातील पार्क मैदानावर १ ते ४ जानेवारी दरम्यान सी. के. नायडू चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ वर्षाखालील खेळाडूंचा होणाऱ्या या फस्टक्लासच्या सामन्यात महाराष्ट्र आणि गोव्याचे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात अर्जुन तेंडूलकर खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबतचे पत्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला पाठवले आहे. सोलापुरातील पार्क चौक स्टेडियम येथे ३ ते ६ डिसेंबर दरम्यान कुचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ वर्षाखालील खेळाडूंचा महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम असा सामना झाला होता. आता १ ते ४ जानेवारी दरम्यान सी. के. नायडू चषक होणार असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी कळवले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
२५ वर्षाखालील खेळाडूंचा महाराष्ट्र आणि गोवा असा सामना होणार आहे. या सामन्यानंतर पार्क मैदानावर रणजीचा सामनाही होणार आहे. संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. नुकतेच रणजी सामन्यात गोवा संघाकडून खेळणारा २३ वर्षीय अर्जुन तेंडूलकर या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुकतेच रणजी सामन्यात गोवा संघाकडून सचिन तेंडूलकर याचा मुलगा २३ वर्षीय अर्जुन तेंडूलकर याने शतक झळकावले होते. आता १ रोजी महाराष्ट्र विरूद्ध गोवाचा सामना होत आहे. त्यामुळे या सामन्यात अर्जुन तेंडूलकर खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
● ‘ही तर फक्त सुरुवात आहे…’
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने बुधवारी रणजी ट्रॉफी स्पर्धेत गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध शानदार शतक (120 धावा) केले. पदार्पणातच आपल्या वडिलांप्रमाणे शतक करणाऱ्या अर्जुनच्या कामगिरीने त्याची बहिण सारानेही आनंद व्यक्त केला आहे. ‘तुझ्या मेहनतीचे फळ आता तुला मिळत आहे, ही तर फक्त सुरुवात आहे, तुझी बहिण असल्याचा मला गर्व आहे,’ अशी पोस्ट साराने इन्स्टाग्रामवर केली आहे.