नागपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दीशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी आता एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दीशा सालियान मृत्यू प्रकरणी ज्याच्या कुठल्याही प्रकारची माहिती असेल त्याने ती पोलिसांकडे सादर करावी, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. SIT probe in Disha Salian death case; Fadnavis’ announcement; Aditya Thackeray in trouble, Sushant Singh
दीशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी होणार आहे. यामुळे विरोधकांनी विधिमंडळात गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षांनी टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली. पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. पूजाच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी चौकशी गरजेची आहे.
सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला AU या नावाने एकूण ४४ फोन आले होते, अशी माहिती देतानाच हा AU म्हणजे अनन्या उधास किंवा आदित्य उध्दव (आदित्य उध्दव (ठाकरे) असे असावे, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे बुधवारी म्हणाले होते.
● मृतावस्थेत आढळली होती दीशा सालियान
दीशा सालियानने आत्महत्या केल्याचे वृत्त ८ जून २०२० ला देण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार दीशाने आत्महत्या केली होती. पण तिची हत्या झाल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता. त्यानंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता.
यामुळे दीशाच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. यासोबतच या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. दीशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी पक्षांकडून चौकशीची मागणी करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आमदार राम सातपुते अंगावर जाणेच बाकी
आमदार राम सातपुते हे मुंबईच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांच्या अंगावरच जायचे उरले होते. पुरवणी मागण्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचे अंडे देणारी कोंबडी केल्याने सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. त्यावेळी भुजबळ यांना साथ देण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदारांनी हल्लाबोल केला. त्यांना एकेरी शब्दात ये खाली बस, खाली बस म्हणत होते.
आमदार मनीषा चौधरी यांनी तुम्ही पंचवीस वर्षात मुंबई लुटली असा आरोप केला. त्यानंतर राम सातपुते हे तर आदित्य ठाकरे यांच्या दिशेने जाऊन जोर जोरात हातवारे करीत आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनावत होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्या मदतीला त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आले नाहीत. ते गप्प बसून होते. मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्यामागे उभे राहिल्याचे चित्र होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार असे तुटून पडल्यावर त्यांना त्यांची साथ मिळाली नाही .
● सुशांत सिंह राजपूत याची हत्याच – नारायण राणे
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर भाष्य केले आहे. दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या झाली आहे, ही माझी ठाम भूमिका आहे, असे राणे म्हणाले. तसेच आता या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, असेही ते म्हणाले.