सातारा : साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आता गोरेंच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा अपघात काल शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास झाला. Satara tweeted about the health of MLA Jayakumar Gore, but his father suspected an accident
आमदार जयकुमार गोरेंची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल येथे उपचार सुरू आहेत. जयकुमार गोरे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहेत. साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
— Jaykumar Gore (Modi Ka Parivar) (@Jaykumar_Gore) December 24, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
फलटणच्या मलठणमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यात गोरेंना किरकोळ जखम झाली आहे. तर यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. पुलावरून गाडी 30 फुट खोल खड्ड्यात पडली आहे. तसेच अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. दरम्यान, गोरे हे माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे भेट देऊन आमदार गोरे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली.
जयकुमार गोरे यांच्या अपघाताविषयी त्यांचे वडील भगवान गोरे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी या अपघातामागे काहीतरी घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. भगवान गोरे म्हणाले, मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. मात्र, एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो? आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे. यामुळे जास्तच शंका येत आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार गोरे मुंबईहून आपल्या घरी साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्यासमवेत गाडीत असलेले इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदारांसह इतर तिघांवरही पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयकुमार गोरे आणि इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.