● ‘ईडी’ सरकार अनैतिक, हट्टवादी मोदी हिंदूविरोधी
पंढरपूर : एकीकडे ‘अवैध मार्गाने बनलेले महाराष्ट्रातील ‘इडी’ सरकार हे अनैतिक सरकार आहे, अशी टिका करतानाच दुसरीकडे ‘मोदी हे हट्टवादी आहेत, ते कोणाचेच ऐकत नाहीत, ते हिंदुत्ववादी नसून हिंदूविरोधी आहेत’ असा घरचा आहेर भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यातील भाजप सरकारसोबतच पंतप्रधान मोदींनाही दिला. BJP’s Subramaniam Swamy rescued BJP in Solapur, scrapped corridor in Pandharpur
भाजपच्याच माजी खासदारांनी भाजपच्या सरकारला आणि पंतप्रधानांवर टीका केल्यामुळे भाजपसह सर्वच पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याबद्दल चर्चा करण्यासाठी स्वामी शनिवारी (ता. 24) पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी पंढरपूरमध्ये शासनाने प्रस्तावित केलेल्या कॉरिडॉरला विरोध दर्शवला.
□ शिवसेना तोडून बनले सरकार
महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस सरकार शिवसेना हा पक्ष तोडून बनवण्यात आले आहे. शिंदे फडणवीस सरकार जनतेतून निवडून आलेले नाही. हे सरकार अनैतिक आहे. त्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील सरकारला टोला लगावला
□ चर्च आणि मशिदी ताब्यात का देत नाही ?
सन १९४७ नंतर मशीद ताब्यात घेतली नाही. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांने सरकारीकरण केले, न्यायालयात जाती मंदिरे मुक्त करणार आहे. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार आहे, असे स्वामी यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रिपदावरही राहणार नाहीत
कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरचे कॉरिडॉर होणार नाही फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाहीत. पंढरपुरात आज विमानतळ नाही. येथील रोड चांगले नाहीत. चंद्रभागा नदीचे पाणी पाम झाले आहे. ते साफ करावे, कामे आधी करावीत. करिडरसाठी येथील मंदिरे, दुकाने तोडण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार से करत आहे, ते योग्य नाही, असा इशारा स्वामी यांनी यावेळी दिला.
□ ते सर्व मोदींचे चमचे
मंदिरे सरकारमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार का? असे विचारलं असता, पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नसून हिंदुत्वादी ते नाहीत, त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत. ते सर्व मोदीचे चमचे आहेत, अशा शब्दात मोदी आणि मोदीभक्तांची स्वामी यांनी खरडपट्टी केली.