सोलापूर : भेळ चांगली नसल्याच्या कारणावरून भेळ विक्रेत्यास मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur. Beating the sheep for not being good; Crime against seven persons old vidi Gharkul
ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राजेश पायलट चौक जुना विडी घरकुल येथे घडली. याप्रकरणी विजय किशोर जाटव (वय-४०, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल, हैदराबाद रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून आकाश कुंभार व त्याच्यासोबत असलेले अनोळखी सहा साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व फिर्यादी यांचा पुतण्या अभिषेक जाटव असे दोघे मिळून भेळ विक्रीच्या हातगाडीवर भेळ विक्री करतात. वरील संशयित आरोपी यांनी त्यावेळी भेळ चांगली दिली नसल्याच्या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीचा पुतण्या यांना आकाश आणि इतराने हाताने मारहाण करत हातगाडी ढकलून देऊन दोन हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.
□ व्यापाराचे घर फोडून चोरट्याने रक्कम पळवली
सोलापूर : सहकुटुंब गावी गेल्यावर अज्ञात चोरट्याने घर फोडून एक लाख पस्तीस हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना दि.२४ ते २५ डिसेंबर दरम्यान गुरु राघवेंद्र नगर मुळेगाव रोड येथे घडली. याप्रकरणी दाऊद इस्माईल अत्तार (वय-३०,रा. गुरु राघवेंद्र नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
फिर्यादी हे फिर्यादी यांचा भाऊ समीर यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी कर्नाटक येथे सहकुटुंब गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत १ लाख ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत.
□ हँडल लॉक करून ठेवलेली दुचाकी पळवली
सोलापूर : अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच.१३.सीआर.८५५४ ही हैदराबाद रोडवरील सहारा हॉटेल समोर पार्क करून ठेवली होती.त्यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी हॅण्डल लॉक तोडून डुप्लिकेट चवीचा वापर करत चोरून नेली आहे.ही घटना दि.२५ डिसेंबर रोजी घडली.याप्रकरणी सुधीर सुभाष सोनकर (वय-३४,रा. मड्डी वस्ती,धनगर गल्ली) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रुपनर हे करीत आहेत.
● ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ; ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : ट्रॅक्टर चालकाने अतिवेगाने व बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर चालवून एका दुचाकीला धडक देऊन दुचाकीचे नुकसान केल्याची घटना दि.२५ डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान महावीर चौक येथे घडली.
याप्रकरणी योगेश महालिंग सोनवणे (वय-२४, रा.भाग्यश्री पार्क, विमानतळ) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.२२ ए. एम.४६०४) या क्रमांकाच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरील ट्रॅक्टर क्रमांकाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर अतिवेगाने व बेकायदेशीरपणे चालवून फिर्यादी यांच्या मोटारसायकल क्र.एम.एच.१३.सीझेड.५५५१ ला धडक देऊन २५ हजार रुपयाचे नुकसान करत फिर्यादी यांना जखमी करून ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे.घटनेचा पुढील तपास मपोना गवसाने या करीत आहेत.