पंढरपूर : प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर अंतर्गत चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाडा बाधित होणार असून सदर वास्तुचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व लक्षात घेवून त्याचे नुकसान करू नये अशी सूचना पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. Exclude Holkar Wada from the proposed Pandharpur Corridor; Instructions to Collector of Archeology Department याबाबत होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी माहिती दिली असून कॅरिडॉर विरोधामधील हे एक मोठे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत महाव्दार पोलीस चौकी ते महाव्दार घाट पर्यंत रूंदीकरण सुचविण्यात आले आहे. या रूंदीकरणामध्ये तसेच प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये अडीचशे वर्षापूर्वीच्या होळकर वाड्यातील राम मंदिर, हनुमान मंदिर देखील बाधित होणार आहेत. यास अनेकांनी कडाडून विरोध केला. होळकर वाड्याचे व्यवस्थापक फत्तेपूरकर यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागास सदर वास्तू विषयक सविस्तर माहिती देत तो बाधित होवू नये यासाठी निवेदन दिले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याची पुरातत्त्व विभागाने दखल घेतली असून राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले आहे. यामध्ये पंढरपूर शहर विकास आराखड्यामधील विषय क्रमांक १३ मध्ये होळकर वाड्यातील श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर याचे नुकसान होणार नाही अशी सूचना केली आहे. सदर पत्रामध्ये होळकर वाड्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान याबाबत होळकर संस्थान इंदोर व येथील विविध पुरातन वास्तू प्रेमींनी होळकर वाड्याविषयी वारंवार प्रयत्न सुरू ठेवले होते. आदित्य फत्तेपूरकर यांनी विविध मंत्री, आमदार, राजकीय पदाधिकारी तसेच अभ्यासकांशी याबाबत संपर्क साधून हा लढा उभारला होता. कॉरिडॉरविरोधी आघाडीसाठी हे एक महत्वाचे यश मानले जात आहे.
बाजीराव विहिरीचे संरक्षण पुणे रस्त्यावरील ऐतिहासिक बाजीराव विहिरदेखील पालखी मार्गाच्या कामांमध्ये बुजविण्यात येणार होती. मात्र याबाबत देखील अशाच पध्दतीने पुरातन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. सदर विहीरीचे प्राचीन महत्व लक्षात घेवून पुरातत्व विभागाने सदर विहीरीचे नुकसान करू नये, अशी सूचना संबंधित विभागास केली होती. यामुळे रस्ता रूंदीकरणात ही विहीर कायम राहिली आहे. याच पध्दतीने होळकर वाडा बचावाला देखील यश आले आहे.