सोलापूर – कॉलेजच्या कबड्डी स्पर्धेच्या वेळी किरकोळ भांडणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले. ही घटना अक्कलकोट येथील फत्तेसिंह ग्राउंडवर बुधवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अक्कलकोट उत्तरच्या पोलिसांनी १४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून काही जणांना अटक केली. Akkalkot. beaten with a stick in a college kabaddi tournament; Crime against fourteen persons
यासंदर्भात स्वामीनाथ महेश आडवीतोटे (वय १९ रा. आझाद गल्ली, अक्कलकोट) या विद्यार्थ्याने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याच्या कॉलेजची कबड्डी स्पर्धा असल्याने तो मित्रासह फत्तेसिंह ग्राउंडवर गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मैदानात काही जणांचे भांडण सुरू झाले होते. त्यावेळी स्वामीनाथ आडवीतोटे आणि त्याचा मित्र समर्थ गवंडी हे भांडणाच्या ठिकाणी गेले होते.
त्यावेळी तू आमच्याकडे का बघतो, असे म्हणत प्रकाश राठोड, आकाश राठोड,आनंद राठोड,अनिकेत राठोड, सोहेब बिराजदार,आकाश चव्हाण, अरबाज शेख (सर्व रा.शिवाजीनगर तांडा) आणि अन्य ७ जणांनी मिळून दोघांना काठी आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यात दोघे जखमी झाले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मोहोळ येथे दिवसा घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल
सोलापूर – एका विवाहितेच्या घरात दिवसा घुसून तिला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना मोहोळ परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी अनिरुद्ध भाऊ शिंगाडे (रा.सारोळे ता.मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ती महिला दुपारच्या सुमारास आपल्या घरात मुली सोबत काम करीत होती. त्यावेळी अनिरुद्ध शिंगाडे हा तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. तिच्याशी असभ्य वर्तन करीत हाताने मारहाण केली.
मदतीसाठी तिने शेजारच्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केली असता आरोपीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिला. अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली. पुढील तपास महिला हेड कॉन्स्टेबल नागरे या करीत आहेत.