पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 12th exam from 21st February and 10th from 2nd March CBSE
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ यादरम्यान होणार असून, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ यादरम्यान होणार आहे. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मंडळांनी पालक, संघटना, शिक्षक यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. या सूचनांचा विचार करून आज परीक्षांचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर केल्या.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळांनी आजपासून www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी वर्ग 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई वर्ग १०वी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी, २०२३ ते २१ मार्च २०२३ पर्यंत. 12वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी, 2023 ते 05 एप्रिल, 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
CBSE ने इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेची तारीख पत्रक 2023 जाहीर करताना सांगितले की, साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये, दोन प्रमुख विषयांमधील परीक्षेत पुरेशी अंतर असणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की, इयत्ता 10वी, 12वीची तारीखपत्रक सुमारे 40 हजार विषयाचे संयोजन तयार केले आहे. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच तारखेला दोन विषयांसाठी उपस्थित राहावे लागणार नाही. केंद्रीय बोर्डाने पुढे सांगितले की, इयत्ता 12वीची तारीखपत्रिका तयार करताना, JEE मेन, NEET,CUET UG यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in‘ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.