Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

लग्नासाठी मुलगी मिळेना, सोलापुरात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Not getting a girl for marriage, the young man from Solapur took the extreme step

Surajya Digital by Surajya Digital
December 31, 2022
in Hot News, सोलापूर
0
लग्नासाठी मुलगी मिळेना, सोलापुरात  तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
0
SHARES
161
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ शेतातील ड्रीपच्या पाईप ने घेतला गळफास

विरवडे बु /प्रतिनिधी : लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन, प्रत्येक तरुण-तरुणी वयात आल्यावर लग्नाची स्वप्न पाहतो. पण कोरवली (ता. मोहोळ) येथील भीमाशंकर काशिनाथ म्हमाणे याचे लग्नाचे स्वप्न हे अधुरेच राहिले. Not getting a girl for marriage, the young man from Solapur took the extreme step  Mohol 

लग्न जमत नसल्यामुळे 22 वर्षीय भीमाशंकरने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरवली (ता.मोहोळ )या गावात राहणारा भीमाशंकर म्हमाणे या तरुणाने मागील वर्षी कर्नाटकातील गुलबर्गा येथील महाविद्यालयात डी फार्मसीची पदवी घेतली होती. स्वतःचा व्यवसाय करावा हे अमोलने ठरवले असताना त्याच्या कुटुंबीयांनी एकाचे दोन हात करण्याचे ठरवलं.

लग्नासाठी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. गेल्या एक वर्षापासून त्याच्यासाठी लग्न स्थळ पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता. बऱ्याच ठिकाणची स्थळे बघितली पण मुलींच्या कडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून नकार मिळत होता.

लग्न न जमल्याने भीमाशंकर म्हमाणे हा तरूण नैराश्यग्रस्त झाला होता. तो सतत मित्र व नातेवाईकांना सांगत होता माझे काय खरे नाही, मी आत्महत्या करणार आहे. मी आज आहे तर उद्या नाही माझ्या जीवनाचे काय खरे नाही अशी खंत त्याने आपल्या मित्र व नातेवाईकांजवळ सतत बोलून दाखवली होती. शेवटी त्याने 29 डिसेंबर रोजी रात्री सात ते अकराच्या दरम्यान त्यांच्या शेताशेजारील शिवानंद ईराण्णा पाटील यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला ड्रीपच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

या घटनेची माहिती कामती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भीमाशंकर याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन करून त्याच्यावर त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न जमत नाही म्हणून वयाच्या 22 व्या वर्षी भीमाशंकर याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

□ पैशासाठी हॉटेल उडवण्याची धमकी, लागला शोध

सोलापूर : साठ लाख रुपये न दिल्यास शहरातील हॉटेल व्यावसायिक प्रियदर्शन शहा यांच्या घरी चिठ्ठी टाकून घर उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदर बाझार पोलिसांनी शहा यांच्या घरीपूर्वी दूध देणाऱ्या इसमाला अटक केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अर्जुन अलकुंटे ( रा. सोरेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. 30) केली. याप्रकरणी शहा यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला होता.

तपासादरम्यान आरोपीने दारूच्या नशेत धमकी दिल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, तो पूर्वी दूध देण्याचे काम करत होता. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे दारूच्या नशेत त्याने धमकी दिल्याचे म्हटलेय.

 

□ मृत अर्भक मिळाल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

सोलापूर : शुक्रवारी (ता. 30) दुपारी घोंगडे वस्ती परिसरातील अहिल्यादेवी मंगल कार्यालयाजवळच्या नाल्यात अंदाजे एक दोन महिन्याच्या मृत अर्भकास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने टाकून दिले होते. तेव्हा त्या अर्भकास तेथील कुत्र्यांनी फरफटत बाहेर आणले.

सदरील हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस हजर होवून जमलेल्या गर्दीला पांगवले. मृत अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

 

भवानी पेठेतील एसटी चौक प्लस टेलरच्या दुकानासमोर कोणीतरी अज्ञात आरोपींनी एक मानवी अर्भक हे जन्माला येण्याआधीच त्याचा मृत्यू घडवून आणून व ती अपत्य जन्माची माहिती लपवून गुप्तपणे त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन बाबुराव भोगशेट्टी यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

Tags: #Notgetting #girl #marriage #youngman #Solapur #took #extreme #step #mohol #koravali#लग्न #मुलगी #मिळेना #सोलापूर #कोरवली #मोहोळ #तरुण #उचलले #टोकाचे #पाऊल
Previous Post

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची 2 मार्चपासून

Next Post

35 हजार शिक्षकांची होणार भरती; दोन टप्प्यात 65 हजार शिक्षक भरती

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
35 हजार शिक्षकांची होणार भरती; दोन टप्प्यात 65 हजार शिक्षक भरती

35 हजार शिक्षकांची होणार भरती; दोन टप्प्यात 65 हजार शिक्षक भरती

वार्ता संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697