पुणे : राज्यात एप्रिल व मे महिन्यात 35 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही टेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात राज्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरूण-तरूणी परीक्षा देतील, असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे. 35 thousand teachers will be recruited; 65 thousand teachers recruitment TET TET exam in two phases
नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरूणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. अडीच ते तीन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसण्याची शक्यता परीक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. तसेच राज्यात शिक्षकांची 65 हजार पदे रिक्त आहेत. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे.
सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती. आता ‘टेट’मुळे त्याला लगाम बसण्यास मदत होणार आहे. एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे आता बंधनकारक आहे. त्याचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार होणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरु आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती आहै.
सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.