मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. जान्हवी माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत फिरताना दिसत आहे. त्यामुळे जान्हवी सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजे शिखर पहाडिया याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात जान्हवी आणि शिखरने हजेरी लावली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Congress leader of Solapur, Janhvi Kapoor will be the granddaughter of the former Chief Minister of Maharashtra? Sushil Kumar Shinde Shikhar Paharia
गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजे शिखर पहाडिया डेट करत आहेत, अशा चर्चा आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे एकत्र दिसत आहेत. नुकताच शिखर आणि जान्हवीचा अनंत अंबानीच्या साखरपुड्यातला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जान्हवी कार्यक्रमात येताच शिखरसोबत गप्पा मारण्यात दंग झाल्याचे दिसत आहे. यापूर्वीही जान्हवी आणि शिखर अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले होते. आता या सगळ्यावरून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.instagram.com/reel/CmwnFgQDm1Q/?utm_source=ig_web_copy_link
जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्या आधी अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही हे दोघे एकत्र दिसले होते. शिवाय बोनी कपूर यांच्यासोबतही शिखरचा फोटो व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र आले. तेव्हापासून ते दोघेही सतत एकत्र दिसतात.
एका रिपोर्टनुसार, शिखरने जान्हवी कपूर कपूरला डेट केले आहे. मध्यंतरी दोघे वेगळे ही झाले होते. जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी परत एकमेकांशी बोलायला सुरुवात केलीय. यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा विचार केलेला आहे.”
शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे. याआधी देखील जान्हवी आणि शिखरला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. 2016 मध्ये जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले. त्यांच्या नात्याबाबत ‘कॉफी विथ करण 7’मध्ये देखील जान्हवीने खुलासा केला होता. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपासून दोघांनी पुन्हा आपल्या नात्याला सुरुवात केली असल्याचं म्हटलं जात आहे.
》 कियारा आणि सिद्धार्थचे होणार लग्न ?
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा आहे. एका माहितीनुसार कियारा आणि सिद्धार्थ हे 6 फेब्रुवारीला लग्न बंधणात अडकणार आहेत. विशेष म्हणजे हे देखील कतरिना आणि विकीप्रमाणेच राजस्थानमध्येच शाही थाटामध्ये लग्न करणार आहेत. यावर कियारा किंवा सिद्धार्थ यांनी अद्याप काही भाष्य केलेले नाही. त्यांचे लग्न तीन दिवस चालणार आहे.