सोलापूर : सोलापूरमध्ये फटाक्याच्या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ घडली आहे. या दुर्घटनेत 6 ते 7 जण जखमी झाले असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली. Massive explosion in firecracker company in Solapur, five dead and seven injured Barshi Pangri
घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिस दल आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या कंपनीत 40 जण काम करत होते. हा अपघात इतका भीषण होता की परिसरातील दोन किलोमीटर पर्यंतचे गवत जळून खाक झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
आगीत कारखाना संपूर्णपणे भस्मसात झाला आहे. घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अजूनही बचावकार्य सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकपाठोपाठ आता सोलापूर तालुक्यातील बार्शीमध्येही भीषण स्फोटाची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ एका फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
स्फोटासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
परिसरातील दहा किलोमीटर पर्यंत गावात या स्फाेटाचा आवाज आला होता. या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरली होती मात्र नेमकी घटना कळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या स्फोटातील फटाक्यामुळे कारखाना परिसरातील दोन किलोमीटरपर्यंतचे गवत जळून खाक होत आहे. शेजारीत चार ते पाच गावातील लोक घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. फटाके फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली असून स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.
सोलापूर ग्रामीण पेालिस दलाचे वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, टेंभुर्णी आदी भागातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत आहेत. आगीचे लोट मोठया प्रमाणात पसरल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे. सोलापूर ग्रामीण पेालिस दलाचे वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.
● इगतपुरीत केमिकल कंपनीत भीषण आग
नाशिकच्या इगतपुरीतील जिंदाल या केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे. घटनास्थळी तत्काळ 10 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत 100 लोकं अडकल्याची माहिती इगतपुरीच्या आमदारांनी दिली. तसेच 20 जण जखमी झाले 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीनंतर या कंपनीत स्फोट होत आहेत. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे.