सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी जवळ शोभेची दारू बनवणाऱ्या फटाक्याच्या कारखान्यात आज स्फोट झाला. यात पहिला तीन, नंतर पाच आता मृतांचा आकडा नऊवर गेला असून यात अनेक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. Death toll rises to nine in Barshi Firecracker Company explosion, many injured Pangri Solapur Shirale
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे – पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला.
या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार नऊ जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
या ठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी आज रविवारी ( ता. १ जानेवारी २०२३) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे.
जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ४ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिस दल आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या कंपनीत 40 जण काम करत होते. हा अपघात इतका भीषण होता की परिसरातील दोन किलोमीटर पर्यंतचे गवत जळून खाक झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
आगीत कारखाना संपूर्णपणे भस्मसात झाला आहे. घटनेत सायंकाळपर्यत पाच जणांचा मृत्यू तर वीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती, यात आता वाढ झालीय. अजूनही बचावकार्य सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकपाठोपाठ आता सोलापूर तालुक्यातील बार्शीमध्येही भीषण स्फोटाची दुर्दैवी घटना घडली आहे. यात भयंकर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.
परिसरातील दहा किलोमीटर पर्यंत गावात या स्फाेटाचा आवाज आला होता. या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरली होती मात्र नेमकी घटना कळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या स्फोटातील फटाक्यामुळे कारखाना परिसरातील दोन किलोमीटरपर्यंतचे गवत जळून खाक होत आहे. शेजारी चार ते पाच गावातील लोक घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.
सोलापूर ग्रामीण पेालिस दलाचे वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, टेंभुर्णी आदी भागातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत आहेत. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे. सोलापूर ग्रामीण पेालिस दलाचे वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.