● पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी
सोलापूर – पत्नी सोबत दुचाकी वरून जात असताना मोटारीतून आलेल्या चौघा इसमानी पत्नीला सोडून त्यांच्या पतीला बळजबरीने मोटारीतून पळवून नेले. ही घटना पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथे शुक्रवारी (ता. 30 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. यात पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी चौघा अपहरण कर्त्याना वाहनासह सोलापुरात रात्री पकडून गुन्हा दाखल केला. A farmer ran over his husband in front of his wife; Pandharpur Solapur Police succeeded in arresting four persons
सोमनाथ पाटील (वय ५३ रा. चौफळा वस्ती, कौठाळी ता. पंढरपूर) असे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी अलका पाटील या बारामती येथून एसटीने भंडीशेगाव येथील बाजीराव विहीर स्टॉप येथे शुक्रवारी सकाळी उतरल्या होत्या. त्यांना दुचाकीच्या पाठीमागे बसवून सोमनाथ पाटील हे कौठाळी येथे घराकडे निघाले होते.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघे खेडभाळवणी येथे आले होते. त्यावेळी पाठीमागून स्कार्पियो मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना वाटेत अडविले. आणि पाटील तुम्ही गाडीत बसा, असे म्हणत त्यांना बळजबरीने मोटारीत बसवून घेतले. आणि मोटर मोहोळच्या दिशेने निघून गेली.
पतीचे अपहरण झाल्यानंतर अलका पाटील यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांच्या पथकाने मोबाईलचा लोकेशन वरून आरोपीचा शोध घेतला. तेंव्हा आरोपी सोलापुरात असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री अपहरण कर्त्याना सोलापुरातील एसटी स्टँड परिसरात वाहनासह ताब्यात घेतले. पुढील तपास हवालदार ढोबळे करीत आहेत.
पैशाच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे समोर आलंय. अपहरणकर्ते हे टिप्पर आणि वाहनाचा व्यवसाय करतात. एका टिप्परच्या व्यवहारात सोमनाथ पाटील हे मध्यस्थी होते. पैशाच्या वादातून त्यांनी पाटील यांचे अपहरण केले, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे धनंजय जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर ग्रामीण) यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विवाहास आड येणा-या वडिलाचा पोटच्या मुलानेच काढला काटा
सोलापूर – प्रेमविवाहास नकार देणाऱ्या वडिलांचा मुलानेच दोन अल्पवयीन बहीण भावंडांच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुरुवातीला हा खून अनैतिक संबंधाच्या कारणातून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तालुका पोलिसांनी सखोल तपास करीत यामधील मुख्य आरोपीस अटक केली आहे. शहरातील दाळे गल्ली येथील अफजल बागवान (वय ५०) यांचा खून झाला असून या प्रकरणी लातूर थील दोन अल्पवयीन बहीण व
भाऊ तसेच मृत अफजल याचा मुलगा सोहेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासेगाव येथील खडी क्रशरजवळ असणाऱ्या कालव्याच्या बाजूस दगडाने डोके व चेहरा ठेचलेला तसेच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन अल्पवयीन मुलांना थांबवून ठेवले होते. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी आम्ही लातूर येथील असून पंढरपूरमध्ये राहत असताना आमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराजवळच राहणाऱ्या अफजल बागवान याचे व आईचे प्रेमसंबंध जुळले, यामुळे तो वारंवार घरी येऊन आम्हाला त्रास देत असल्याचे सांगितले.
या रागातून आम्ही आज पंढरपूरमध्ये येऊन अफजल यांना आम्हाला मामाच्या घरी जायचे आहे असे सांगून या ठिकाणी रिक्षातून घेऊन आलो. रिक्षा गेल्यानंतर पायी जात असताना अफजल यांच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले तसेच ते पळून जाऊ लागताच त्यांच्या पायाला दोरी बांधली व डोक्यावर दगड मारून खून केला असल्याची कबुली दिली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी या मुलांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचे मृत अफजल याचा मुलगा सोहेल याच्याबरोबर प्रेम असल्याची माहिती दिली. यामुळे सदर अल्पवयीन मुलगी व सोहेल दोघे लग्न करणार होते. परंतु अफजल याचा या विवाहास विरोध होता. यामुळेच या तिघांनी मिळून अफजलचा खून करण्याचे ठरविले.
लातूरहून आलेल्या या दोघांनी सोहेलची भेट घेऊन अफजल यास निर्जनस्थळी आणण्याचे ठरविले. या ठिकाणी सोहेलने वडिलांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी तातडीने फरार सोहेल व दोन अल्पवयीन मुले यांना ताब्या घेतले असून पुढील तपास कर आहेत.