पुणे : पिंपरी- चिंचवडच्या वकिलाचा अर्धवट जळलेला मृतदेह तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळल्याने खळबळ उडाली आहे. गायब झालेल्या वकिलाची हत्या झाल्याची शक्यता पोलीस तपासात वर्तवली जात आहे. Partially burnt body of lawyer found, murder suspected Kalewadi Pune Pimpri Chinchwad
वकील शिवशंकर शिंदे हे 31 डिसेंबरच्या दुपारी बेपत्ता झाले होते. पोलीस शोध घेत असतानाच त्यांचा मृतदेह आढळला आहे. शिवशंकर यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना असून तिथे तुटलेली बटन आणि रक्त आढळले आहे. त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला आहे. नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी याप्रकरणी काहींना ताब्यातही घेतलं आहे. वकील शिंदे यांचे ते नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनीच पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह पेटवला मात्र तो अर्धवटच जळल्याचं समोर येत आहे.
शिवशंकर शिंदे यांचं काळेवाडी येथे ऑफिस आहे. तिथून ते बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस शोध घेत असतानाच त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ही हत्या आहे का? या बाजूने देखील पिंपरी- चिंचवड पोलास तपास करत आहेत. मृत शिवशंकर यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना आहे. तिथं, तुटलेली बटन आणि रक्त आढळलं आहे. यामुळं त्यांचं अपहरण करून तर हत्या केली नाही ना असा संशय पोलिसांना आहे. त्याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. सीसीटीव्ही द्वारे त्याचा तपास पोलीस करत आहेत.
वकील शिवशंकर शिंदे 31 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला, परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे बेपत्ता झाल्याची शंका त्यांच्या मनात आली. यानंतर कुटुंबीय वाकड पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते.
परंतु वाकड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. अखेर रात्री उशिरा वकील शिवशंकर शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. पोलिसांनी तपास देखील सुरु केला. मात्र तपास सुरु झाल्यानंतर काही तास उलटले नाहीत तोपर्यंत शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला आहे.
मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांची हत्या झाली असावी असा संशय वाकड पोलिसांनी व्यक्त केला. त्यात नांदेडमधील पोलिसांनी शिंदे यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनीच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अर्धवटच जळाला. आता या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच वकील शिवशंकर शिंदे यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.