Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरातील उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ चॅम्पियन! पुणे विद्यापीठास दुसरे तर सोलापूरला तिसरे बक्षीस

Nagpur University Champion in Utkarsh Festival in Solapur! Pune University got the second prize and Solapur got the third prize

Surajya Digital by Surajya Digital
January 5, 2023
in Hot News, सोलापूर
0
सोलापुरातील उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ चॅम्पियन! पुणे विद्यापीठास दुसरे तर सोलापूरला तिसरे बक्षीस
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस 28 गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. Nagpur University Champion in Utkarsh Festival in Solapur! Pune University got the second prize and Solapur got the third prize सर्वसाधारण विजेतेपदाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 27 गुणांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 23 गुणांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठ कॅम्पस येथे करण्यात आले होते.

आज गुरुवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे जागतिक ख्यातीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव आणि जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थिती होती.

व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

 

यावेळी डॉ. वनंजे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापटाणे उत्कर्ष महत्त्वाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट केल्याचे सांगून पुढील वर्षी उत्कर्ष महोत्सवात विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कलाप्रकार देखील वाढवून एनएसएसचे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असे तयार झाले पाहिजे, अशी भूमिका शासनाची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

ज्येष्ठ पत्रकार दिवाणजी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे समाजकार्याची आवड लागून स्वावलंबी मनुष्य तयार होतो, असे सांगत माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर देखील राष्ट्रीय सेवा योजनेचा खूप मोठा प्रभाव झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनात एनएसएसमुळे राष्ट्रप्रेम निर्माण होऊन समाजाचे आपण एक घटक आहोत, अशी जाणीव निर्माण होते, असे सांगून विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात समाजासाठी देशासाठी कार्य करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पूजा पानसे, जळगाव विद्यापीठाचे डॉ. प्रदीप आवसेकर पुणे विद्यापीठाची श्रुती बोरस्ते आणि मुंबईच्या एचएसएनसीचा सागर तोलनकर यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. पारितोषिक वितरण समारंभात निकालपत्राचे वाचन डॉ. दत्ता घोलप यांनी केले. गोल्डन बॉय व गोल्डन गर्लच्या मानपत्राचे वाचन प्रा. ममता बोल्ली यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर गुणवंत सरवदे यांनी आभार मानले.

 

□ उत्कर्ष महोत्सवाचा निकाल :

(अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)

शोभायात्रा: मुंबई विद्यापीठ मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
भित्तीचित्र: बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.

कार्यप्रसिद्धी अहवाल: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.

संकल्पना नृत्य: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ मुंबई.

पथनाट्य: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

समूहगीत: एसएनडीटी विद्यापीठ नागपूर, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

लोकवाद्य: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.

लोककला: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.

भित्तिचित्रे घोषवाक्यसह: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.

निबंध स्पर्धा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नागपूर.
वक्तृत्व स्पर्धा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.

काव्यवाचन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.

छायाचित्र स्पर्धा: संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.
गोल्डन बॉय: कृष्णा रिटे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

गोल्डन गर्ल : श्रुती बोरस्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
उत्कृष्ट संघनायक: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबई.

 

Tags: #NagpurUniversity #Champion #UtkarshFestival #Solapur #PuneUniversity #got #secondprize #Solapur #thirdprize#सोलापूरविद्यापीठ #उत्कर्षमहोत्सव #नागपूरविद्यापीठ #चॅम्पियन #पुणेविद्यापीठ #दुसरे #सोलापूर #तिसरे #बक्षीस
Previous Post

सोलापुरात बस पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही पण 35 जण जखमी

Next Post

सोलापुरातील ‘इंद्रभुवन इमारत’ प्रजासत्ताक दिनापासून नागरिकांना पाहण्यासाठी होणार खुली

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महापालिकेत तब्बल 1125 कर्मचारी – अधिकाऱ्यांची पदे रिक्त !

सोलापुरातील 'इंद्रभुवन इमारत' प्रजासत्ताक दिनापासून नागरिकांना पाहण्यासाठी होणार खुली

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697