नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राम मंदिराच्या उभारणीवरून मोठी घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर तयार होईल, असं अमित शाह म्हणाले आहेत. Work on Ram temple will be done before Lok Sabha: Union Home Minister Amit Shah announced राम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी समस्त देशवासी आतुर झाले आहेत. त्यामुळे हे मंदिर पूर्ण होऊन दर्शनासाठी कधी खुले होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अमित शाहांनी तारखेबाबत मोठी घोषणा केली आहे.
पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच राम मंदिर दर्शनासाठी खुलं होऊ शकतं. अमित शाह म्हणाले की, राम मंदिरप्रश्नी काँग्रेसच्या काळात कोर्टकचेरी सुरू होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि मोदींनी त्याच दिवशी राम मंदिराचे भूमिपूजन पूर्ण करून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.
आता १ जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर तयार झालेलं असेल, असं अमित शाह म्हणाले. राम मंदिराबाबतची कायदेशीर लढाई १३५ वर्षांपेक्षा जास्त वेळ चालली. १५ व्या शतकापासून सुरू असलेल्या लढाईला २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला.
सर्वोच्च न्यायालयाने या विवादीत जमिनीवर राम मंदिराच्या उभारण्याची परवानगी दिली. तसंच, मुस्लीम समाजाला दुसरी जागा देण्याचे ठरवण्यात आले, असं अमित शाह म्हणाले. सर्वो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक ट्रस्ट बनवून भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात केली गेली. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचे भूमी पूजन झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमित शहा यांच्या व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
दरम्यान, २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधीच राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यास भाजपाला याचा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच या मंदिराचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याच्या चर्चांना आता बळ मिळालं आहे.
मंदिराचे तीन टप्प्यांत निर्माण होत आहे. पहिला टप्पा 30 डिसेंबर 2023 ला पूर्ण होईल. त्यात मंदिर गाभाऱयासह 5 मंडप असतील. 2024 ला मकरसंक्रात दिनी प्रभू श्रीराम तेथे विराजमान होतील. भाविकांना 19 फूट अंतरावरून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येईल. मंदिराचा दुसरा टप्पा 30 डिसेंबर 2024 ला पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात दुसरा आणि तिसरा मजला पूर्ण होईल. मंदिराचा तिसरा टप्पा 30 डिसेंबर 2025 ला पूर्ण होईल.
अमित शहा यांनी काँग्रेसवरही चांगलाच हल्लाबोल केला. मी २०१९ मध्ये भाजपचा अध्यक्ष होतो तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी राहुल बाबा दररोज विचारायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. राहुल गांधी आज कान उघडून ऐका. एक जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिर बांधकाम पूर्ण होऊन तयार असेल. काँग्रेसशिवाय इतर पक्षही मंदिर कधी होणार याची तारीख विचारायचे. निवडणुकांच्या प्रचार सभांमध्येही हा प्रश्न उपस्थित केला जायचा.
काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे असेही अमित शहायांनी सांगितले.