सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना आणि समाजाच्या संस्था यांना भाजपने कधीच विरोध केला नाही. भाजपनेत्यांनी उलट प्रत्येकवेळी मदत केली. मात्र आ. विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येकवेळी पडद्यामागे राहून विरोधकांना रसद पुरवत ‘सिध्देश्वर’ला विरोध करण्याचे काम केले’, असा उघडउघड आरोप सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केला. Allegation / Challenge: Vijaykumar Deshmukh’s own opposition to Siddheshwar Sugar Factory is in the field, now get a ticket and show Dharmaraj Kadadi
धर्मराज काडादी म्हणाले, ‘ मी तुमच्याविरोधात १९९६ पासून मैदानातच उभा आहे, कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्येकवेळी तुम्हाला धूळ चारली आहे. आताही मी मैदानातच आहे, आता तुम्ही तिकीट मिळवून दाखवा, त्यातही तिकीट मिळालेच तर तुमची विश्वासार्हता टिकवून दाखवा’, असे खुले आव्हान सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी भाजपचे आ. विजयकुमार देशमुख यांना पत्रकार परिषदेत दिले आहे.
श्री सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीवरून सध्या आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चात काडादी यांनी शहर उत्तरचे नेतृत्व बदलण्याचे आवाहन समाज बांधवांना केले होते. त्यावरून ‘असेल हिंमत तर मैदानात या’ असे आव्हान आ. देशमुखांनी दिले होते. शुक्रवारी (ता. 6) पत्रकार परिषद घेऊन काडादी यांनी त्यांना प्रतिआव्हान दिले. आ. देशमुख यांच्याच आव्हानाचा धागा पकडत काडादी यांनी कारखाना आणि कारखान्याच्या चिमणीला विरोध करणाऱ्यांचा खरा चेहरा पत्रकार परिषदेत उघड केला.
चिमणीचा प्रश्न सोडविण्यासाठी १९ डिसेंबर २०२२ रोजी कारखान्याचे सभासद शेतकरी, कर्मचारी यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळची सभा पाहून आणि सभेत भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक सुरेश पाटील, सुभाष शेजवाळ यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सामील झाले. माजी आमदारासह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी हजर राहून कारखान्याच्या बाजूने आपली भूमिका मांडून झारीतील शुक्राचार्य शोधून काढा, त्याला उघडे पाडून त्याचा बंदोबस्त करू, असे आवाहन केले.
या सर्व नेत्यांची भूमिका आणि सूर पाहता आ. विजयकुमार देशमुख यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे. कोणताही पक्ष चिमणीच्या आड नसून फक्त विजयकुमार देशमुख हेच चिमणीच्या आड आहेत; हे शेतकरी, कर्मचारी व नागरिक यांच्या लक्षात आले आहे. सभेत माझ्यासह अनेक वक्त्यांनी नाव न घेता त्यांना इशारा दिला. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन विजयकुमार देशमुख यांनी माझ्यावर आणि सिध्देश्वर परिवारावर टीका करण्यास सुरुवात केली, असा आरोप काडादी यांनी यावेळी केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
धर्मराज काडादी यांच्या पत्रकार परिषदेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
● मी मैदानातच आहे
मी १९९६ पासून मैदानात आहे. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सिध्देश्वर पॅनलच्या माध्यमातून विजयकुमार देशमुख यांनाच पराभूत करून धूळ चारली आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलचे डिपॉजिटदेखील जप्त झाले आहे. माझी विश्वासार्हता सिध्द केली आहे. परंतु २००१ ते २०११ पर्यंत मोठ्या मनाने माझ्या पॅनेलमध्ये घेऊन त्यांना संचालक केले; हे आता ते विसरले आहेत. आता निवडणूक मैदानात उतरणारच; असे आव्हान देत आता आ. देशमुख यांनी आजपासून तिकीट मिळवण्यासाठी आणि मिळाले तर विश्वासार्हता टिकवण्यासाठी धडप करावी, असे प्रतिआव्हान देशमुखांना दिले
● बोरामणी विमानतळासाठी समिती
बोरामणी विमानतळ विकास आणि श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बचाव समितीची घोषणा काडादी यांनी यावेळी केली. धर्मराज काडादी, अँड. रा. गो म्हेत्रस, प्रा रावसाहेब पाटील, सिध्देश्वर कल्याणशेट्टी, सुभाष शेजवाळ, अमोल हिप्परगी, दत्ता थोरे, प्रा. राज चव्हाण, अशोक बिराजदार, हरिभाऊ कुलकर्णी आणि दिनेश शिंदे यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. ही समिती बोरामणी विमानतळ विकास आणि श्री सिध्देश्वर साखर कारखाना बचाव व तूर्त होटगी रोड येथील विमानतळावरून एकाच बाजूने विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वच स्तरावर पाठपुरावा करणार आहे.
● भाजप नेते कारखान्याच्या बाजूने
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर कारखान्याला पाठिंबा आहेच. शिवाय भाजपनेते आणि तत्कालीन हवाई उड्डाणमंत्री यशवंत सिन्हा, विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार प्रभाकर कोरे, अमर साबळे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कारखान्याला समर्थन आहे.
शिवाय आ. सुभाष देशमुख यांनी बोरामणी विमानतळासाठी, खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी होटगीरोड विमानतळावरून १९ आसनी विमानसेवेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पालकमंत्री विखे-पाटील हेसुध्दा सकारात्मक आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्याच हस्ते कारखान्याचा ५० वा गळीत हंगाम शुभारंभ झाला आहे.
□ आ. देशमुखांच्या खोड्या
* सोलापूर विकास मंचला पत्राद्वारे पाठिंबा देणे
* त्यांच्या आंदोलनाला आतून मदत करणे
* २०१४ मध्ये पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व बांधकाम परवान्यांच्या अटींवरून वारंवार नोटिसा देण्यास भाग पाडणे
* कारखान्याचे सांस्कृतिक भवन, संगमेश्वर महाविद्यालय, श्री सिध्देश्वर देवस्थानचे वेगवेगळे प्रकल्प यांच्या बांधकामाचे परवाने अडवून ठेवणे
* होम मैदानावरील आपत्कालीन रस्त्याचा विषय चिघळवणे इत्यादी प्रकारच्या खोड्या आ. देशमुख यांनीच केल्याचा आरोप काडादी यांनी यावेळी केला.
* साखर कारखान्याच्या अनेक प्रस्तावांना आडकाठी आणणे
* पालिकेतील सत्तेच्या माध्यमातून अडथळे आणणे