□ एकाच गाडीत प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
पुणे : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी ऐकून सामान्यजन कधी कधी वैतागून जातात पण जेव्हा राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते एकत्र आले तर केवळ राजकीय पंडितांच्याच नव्हेतर कॉमन पिपलच्याही भुवया उंचावल्या जातात. रविवारी पुण्यात असाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. Devendra Fadnavis breaks protocol and honors Sharad Pawar at Bharti University
राज्यात अनेक विषयांवरून ज्याच्यात टीकेची जुगलबंदी होते, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहून उपस्थितांनी चक्क कपाळावर हात ठेवला. झाले असे की- काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पवार व फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.
कार्यक्रमाला जात असताना पवार- फडणवीसांनी एकत्रित प्रवास करून महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचे दर्श घडवले. देवेंद्र चला माझ्या गाडीतून.. असे पवार फडणवीसांना म्हणाले पवारांच्या गाडीतून काही वेळाकरित प्रवास केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कार्यक्रमाच्या आधी भारती विद्यापीठ परिसरात पवार आणि फडणवीस यांनी पवारांच्या गाडीतून एकत्र प्रवास करत संस्थेची पाहणी केली. मेडिकल कॉलेजचे गेस्ट हाऊस ते लेडीज होस्टेलपर्यंत पवार आणि फडणवीसांनी एकत्रित प्रवास केला. यावेळी गाडीमध्ये मागील सीटवर पवार आणि फडणवीस होते, तर पुढच्या सीटवर शिवाजीराव कदम होते. मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून जात असताना चला माझ्यासोबत… असे पवार फडणवीसांना म्हणाले. त्यानंतर फडणवीस पवारांच्या गाडीत बसले. राजकीय गदारोळात पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
□ माझे छोटे बंधू….
काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याला कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजीत कदम यांचा उल्लेख ‘माझे छोटे बंधू’ असा केल्याने कार्यक्रमस्थळी एकच चर्चा रंगली.
》 क्रिकेट असोसिएशनात रोहित पवार बिनविरोध, रोहित पवार लागले कामाला
मुंबई : आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोसिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. 16 सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती. या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर रोहित पवार लगेचच कामाला लागले. त्यांनीच याबाबत सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माहिती दिली. “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या गहुंजे येथील स्टेडियमची माझे मित्र आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासोबत पाहणी केली. तसेच पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहील, असेही ते म्हणाले.