पंढरपूर : एनडीएने मला लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचा जरूर विचार करु असं जानकर यांनी पंढरपुरात स्पष्ट केलं आहे. रासपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आज महादेव जानकर पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. जानकर यांनी पुन्हा भाजपला डिवचले आहे. If the Lok Sabha candidature is rejected, we will consider another option; Mahadev Jankar’s warning to Pandharpur BJP
राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यातील व केंद्रातील एनडीएचे सरकार बनणार नाही. आगामी 2024 च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपने तसा बंदोबस्त केला आहे, असा सूचक इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला दिला आहे.
रासप पक्ष सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे 2024 साली आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीए चे सरकार बनणार नाही. यांची आम्ही काळजी घेऊ. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती , परभणी आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पंकजाताई मुंडे यांच्या मागे आपण एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहू , मात्र त्यांच्या नाराजी बद्दल भाजप योग्य तो निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया दिली. रासपचे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष पंकज देवकते, कुमार सुशिल, ॲड. संजय माने, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, आबा मोटे, महाळाप्पा खांडेकर,संजय लवटे, रणजित सुळ आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ जिल्हा नियोजनच्या माजी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा
पंढरपूर : आमच्या शेतामधून वाहने का घेऊन जाता अशी विचारणा करणाऱ्या महिलेस जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे व त्याच्या मेव्हण्याने जबर मारहाण केली असून याप्रकरणी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेची तालुक्यातील ईश्वरवठार येथे शेती असून सोमवारी सदर महिला आपल्या शेतात काही कामानिमित्त गेली होती. यावेळी सदर महिलेने संतोष सुळे याच्या शेतातील गड्यास तुम्ही आमच्या शेतामधून न विचारता वाहने का घेऊन जाता असे विचारले. यावेळी संतापलेल्या संतोष सुळे याने या महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. तर त्याचा मेव्हणा बाळू गावडे याने देखील पीडित महिलेस मारहाण करून सदर तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले.
संतोष सुळे व बाळू गावडे यांच्या विरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.