Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

हुतात्मा दिन | चार हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन

Martyr's Day | Salutations to the memory of four martyrs Solapur

Surajya Digital by Surajya Digital
January 12, 2023
in Uncategorized
0
हुतात्मा दिन | चार हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. Martyr’s Day | Salutations to the memory of four martyrs Solapur तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे… मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय – सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत.

पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा… या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८-९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावावर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलना दरम्यान दि. 9 – 10 – 11 मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते.

 

भारतातील ‘स्वतंत्र’ (काही काळासाठी) झालेला असा हा पहिला भाग ! मे – जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस ‘मार्शल लॉ’ हा कायदा सोलापूरला लागू होता. कायदा मोडला म्हणून सोलापूरच्या चार निरपराध युवकांना फाशी देण्यात आली. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदेहे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते.

 

पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील १२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फासावर गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.

Tags: #Martyr'sDay #Salutations #memory #four #martyrs #Solapur#हुतात्मादिन #चार #हुतात्म्या #स्मृती #अभिवादन #सोलापूर
Previous Post

लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायचा विचार करू; महादेव जानकरांचा इशारा

Next Post

भावाला दीर्घायुष्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ बहिणीचे जपले नाते

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भावाला दीर्घायुष्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ बहिणीचे जपले नाते

भावाला दीर्घायुष्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ बहिणीचे जपले नाते

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697