अकलूज : पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअर असलेला धाकटा भाऊ म्हाकू मारूती विरकर (वय ३२) यांच्या दोन्ही ही किडन्या लहान वयातच खराब झाल्यामुळे त्याला एका किडनीची अत्यंत आवश्यकता होती. यास बहिणीने जीवदान दिलंय. भावाला दीर्घायुष्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ बहिणीचे नाते जपलं आहे. Sister donates own kidney to brother for long life, preserves brother-sister relationship Solapur Akluj Anganwadi Sevaka
भाऊ व बहीणीचे एक अतूट नाते असते याची प्रचिती माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावातील प्रतापनगर येथील अंगणवाडी सेविका संगीता कोळेकर यांनी आपल्या लहान भावाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे आपली एक किडनी भावाला दान करून बहिणीचे कर्तव्य निभावले आहे. पुणे येथे जहाँगीर हॉस्पीटल या ठिकाणी या दोघांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.
पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअर असलेला धाकटा भाऊ म्हाकू मारुती विरकर (वय ३२) यांच्या दोन्ही ही किडन्या लहान वयातच खराब झाल्यामुळे त्याला एका किडनीची अत्यंत आवश्यकता होती. अंगणवाडी सेविका असलेल्या संगीता कोळेकर (वय – ४२) यांनी वेळेचा विलंब न करता त्यांनी आपली एक किडनी भावाला देवून एका बहिणीचे कर्तव्य तर पार पाडलेच पण त्याच बरोबर भावाचा जीव वाचवला आहे. भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणीने दातृत्वाचे काम केले आहे.
श्रीमती संगीता कोळेकर या गेली २५ वर्ष चाकोरे येथील अंगणवाडीत सेविका पदावर कार्यरत आहेत. दहा वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले असून त्या दिवसापासून त्या एकट्या व त्यांच्या सासू संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीन ही मुली कृषी महाविद्यालयाची पदवी प्राप्त केली आहे. श्रीमती कोळेकर यांना भावाला किडनी दिल्यामुळे त्याचा त्यांना आनंद तर झालाच पण आई वडिलांच्या चेह-यावरच्या आनंदाने त्या खूप समाधानी आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायचा विचार करू; महादेव जानकरांचा इशारा
पंढरपूर : एनडीएने मला लोकसभेला उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचा जरूर विचार करु असं जानकर यांनी पंढरपुरात स्पष्ट केलं आहे. रासपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आज महादेव जानकर पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. जानकर यांनी पुन्हा भाजपला डिवचले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यातील व केंद्रातील एनडीएचे सरकार बनणार नाही. आगामी 2024 च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपने तसा बंदोबस्त केला आहे, असा सूचक इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला दिला आहे.
रासप पक्ष सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे 2024 साली आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीए चे सरकार बनणार नाही. यांची आम्ही काळजी घेऊ. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती , परभणी आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पंकजाताई मुंडे यांच्या मागे आपण एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहू , मात्र त्यांच्या नाराजी बद्दल भाजप योग्य तो निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया दिली. रासपचे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष पंकज देवकते, कुमार सुशिल, ॲड. संजय माने, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, आबा मोटे, महाळाप्पा खांडेकर,संजय लवटे, रणजित सुळ आदी उपस्थित होते.