सोलापूर : सीसीएच ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत येरंकोल्लू,जयंत येरंकोल्लू व स्मिता येरंकोल्लू यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलिस तिघा आरोपींच्या शोधात होते. Two in police custody for seven days in CCH app fraud case, Yash Solapur police in two months
दरम्यान, यातील अनंत व जयंत येरंकोल्लू यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यांनी मंगळवारी अटक केली. बुधवारी (ता.11) त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश पाठवदकर यांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या युक्तिवादा दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याचा आवाका मोठा आहे, आर्थिक गुन्हा आहे,आरोपी हे अँप कसे चालवत होते, अॅपचे मूळ मालक कोण व आरोपींनी यात वापरलेली तंत्रज्ञान याची सुद्धा चौकशी करायची आहे म्हणून पोलिसांनी आरोपींची चौकशी साठी १० दिवसाची पोलीस कोठडी मागितली.
दरम्यान आरोपीकडून ॲड.मंजुनाथ कक्कळमेली यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा पूर्णतः तांत्रिक आहे, शिवाय फिर्यादी आपल्या तक्रारीत आरोपींना पैसे दिले, असे कुठेही उलगडा होत नाही. आरोपींच्या खात्यामध्ये यातील कुठलेही फिर्यादीनी पैसे गुंतवले नाही. शिवाय ॲपचा मूळ मालक कोण याची चौकशी गूगल व बायनान्स अँपकडे केलं तर मूळ आरोपीचा शोध लागू शकतो. शिवाय आरोपीने स्वतः ११ लाख, ६३ हजार हुन जास्त रक्कम गुंतवली आहे. त्यामुळे आरोपींची सुद्धा फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांना पोलीस ताबा देण्यात येऊ नये, असे युक्तिवाद केले असता विशेष न्यायाधीश पाठवदकर यांनी आरोपीस ७ दिवसाची अर्थात १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत व आरोपी कडून ॲड.मंजुनाथ कक्कलमेली यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापुरात लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक
सोलापूर : एका गुन्ह्यामध्ये नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
पांगरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ जयजयराम खुणे (वय ३८), पोलिस शिपाई सुनिल पुरभाजी बोदमवाड (वय ३१) व चहा कॅन्टीन चालक हसन इस्माइल सय्यद (वय ६९) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तक्रारदार तसेच त्यांच्या भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दाखल गुन्ह्यातत तक्रारदार व त्यांच्या भावास न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात त्या दोघांना नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्यासाठी तपासी अधिकारी खुणे आणि बोदमवाड यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयेप्रमाणे ३० हजार रुपये लाचेची मागणी करत ही रक्कम कॅन्टीन चालक हसन सय्यद याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर कॅन्टीनचालक सय्यद यास ही रक्कम स्विकारतांना ताब्यात घेण्यात आले. ही रक्कम तो या दोघांसाठी घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोकॉ सलीम मुल्ला, गजानन किणगी उडानशिव, शाम सुरवसे यांनी पार पाडली आहे.