Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पालकमंत्री विखे – पाटील यांची सोलापुरात गाडी अडवण्याचा प्रयत्न

Mohol farmers tried to block Guardian Minister Vikhe-Patil's car in Solapur

Surajya Digital by Surajya Digital
January 13, 2023
in Uncategorized
0
पालकमंत्री विखे – पाटील यांची सोलापुरात गाडी अडवण्याचा प्रयत्न
0
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न आज सोलापुरात झाला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ते जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून बाहेर पडत असतानाच त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर दोन शेतकरी युवक आडवे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे गोंधळ उडाला. Mohol farmers tried to block Guardian Minister Vikhe-Patil’s car in Solapur

गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत असताना पालकमंत्री न्याय द्या…, न्याय द्या… असे म्हणून ते गाडीसमोर झोपले. याचवेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने संबंधित युवकास बाजूला करून ताब्यात घेतले.

पालकमंत्री यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या युवकांच्या घटनेमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस गोंधळून गेले. उपस्थितीना काही कळायच्या आत पोलिसांनी त्यांना दूर कैले. या घटनेमुळे पालकमंत्र्यांचा वाहनांचा ताफा काही वेळ थांबला होता. यामुळे नियोजन भवनासमोर गोंधळ निर्माण झाला.

 

अभिजित गोरख नेटके (रा. तांबोळी, ता. मोहोळ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना अभिजीत नेटके यांनी सांगितले की, तांबोळी येथे रामचंद्र नेटके यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून अवैधरित्या घरांचे बांधकाम चालू केले आहे. घरकुलाचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर केल्यास वाहतूकीस अडथळा होणार आहे.

 

याबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांना तक्रारी अर्ज देऊन सुध्दा संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केल्याचे अभिजित नेटके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ माजी सरपंच, माजी जि.प. सदस्य शिवलिंगप्पा कोडले यांचे निधन

 

अक्कलकोट : वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील ज्येष्ठ नागरिक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. वळसंगचे सलग २५ वर्षे सरपंच होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपदी सलग पंधरा वर्षे त्यांच्याकडेच होते. माजीमंत्री कै. आनंदराव देवकते यांचा उजवा हात म्हणून ते ओळखले जात असत. त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवारी (ता. १३) दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

Tags: #Mohol #farmers #tried #block #GuardianMinister #Vikhe-Patil's #car #Solapur#पालकमंत्री #विखेपाटील #सोलापूर #गाडी #अडवण्याचा #प्रयत्न #शेतकरी #मोहोळ
Previous Post

CCH App सीसीएच ॲप फसवणूक प्रकरणी दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी, दोन महिन्याने पोलिसाना यश

Next Post

रेनगरसाठी नगरपालिका घोषित करण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी केले आमदार कल्याणशेट्टींकडे बोट

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
रेनगरसाठी नगरपालिका घोषित करण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी केले आमदार कल्याणशेट्टींकडे बोट

रेनगरसाठी नगरपालिका घोषित करण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी केले आमदार कल्याणशेट्टींकडे बोट

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697