Thursday, June 1, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

रेनगरसाठी नगरपालिका घोषित करण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी केले आमदार कल्याणशेट्टींकडे बोट

Demand for declaration of municipality for Raynagar, Guardian Minister asked MLA Kalyanshetty to boat Narsayya Adam Solapur

Surajya Digital by Surajya Digital
January 13, 2023
in Uncategorized
0
रेनगरसाठी नगरपालिका घोषित करण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी केले आमदार कल्याणशेट्टींकडे बोट
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ श्रमिकांच्या हक्काच्या घरकुलासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री

 

सोलापूर : कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारत असलेला 30 हजार घरांचा प्रकल्प हा भांडवलदारांचा नसून श्रमिक – कष्टकर्‍यांचा आहे. तेव्हा श्रमिकांना हक्काचा निवारा देणार्‍या या प्रकल्पपूर्तीसाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी दिली. Demand for declaration of municipality for Raynagar, Guardian Minister asked MLA Kalyanshetty to boat Narsayya Adam Solapur

 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी रेनगरला भेट देऊन या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरणही करण्यात आले. याप्रसंगी या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेविका कामिनीआडम, माकपचे जिल्हा सचिव एम.एच. शेख. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद राऊत, म्हाडाचे सीईओ नितीन माने, जि.प.च्या सीईओ मनीषा आव्हाळे, एमजेपीचे अधिकारी उमाकांत माशाळे, बांधकाम खात्याचे अधिकारी महाजन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रारंभी प्रकल्पाबाबत बोलताना नरसय्या आडम म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारत असलेल्या रेनगर गृहप्रकल्पाकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सर्वतोपरी सहकार्य केले असून आतादेखील संपूर्ण सहकार्याची त्यांची भूमिका आहे. हा प्रकल्प 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या प्रकल्पासाठी पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी 300 कोटी मंजूर आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

रे नगर कार्यक्रमासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

आडम मास्तर म्हणाले, या कामांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावे यासाठी आमचा जोरदार पाठपुरावा आहे, पण आचारसंहिता आदी कारणांमुळे ते येऊ शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी यावेत, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. आडम यांनी केल्या विविध मागण्या
यावेळी नरसय्या आडम यांनी विविध महत्वाच्या मागण्या मांडल्या.

 

रेनगरसाठी नगरपालिका घोषित करावी, ही मान्यता मिळाली तर नगरपालिकेच्या सर्व सुविधा या प्रकल्पाला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या पाणी योजनेच्या गुणवत्ता तपासणी अहवाल व तांत्रिक खर्चासाठी तीन टक्के शुल्काची आकारणी केली जात आहे. पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता अतिरिक्त एक टक्के वाढीव शुल्काची मागणी केली आहे. हे शुल्क अवाजवी असल्याने संपूर्ण शुल्कमाफी द्यावी, कॉ. मीनाक्षी साने विडी कामगार घरकुलासाठी असलेली स्टँपड्युटी 25 हजारांवरून एक हजार करावी, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधीची कमतरता आहे, पण लाभार्थ्यांच्या गृहकर्जाबाबत विलंब होत असल्याने शासनाने म्हाडाला 15 टक्के रक्कम विशेष निधी म्हणून द्यावी. घरांचे वितरण होण्याआधी कर्जाची उपलब्धता झाल्यावर हा निधी शासनाला परत करू, अशा विविध मागण्या आडम यांनी केल्या.

 

आडम यांच्या मागण्यांबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प श्रमिकांचा असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संपूर्ण शुल्कमाफी मिळावी यासाठी शासनदरबारी प्रयत्न करेन. या नगराला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पासाठी माझ्या अखत्यारितील असलेल्या विषयांबाबत मी शंभर टक्के सकारात्मक निर्णय घेणार आणि अखत्यारितील नसलेल्या विषयांबाबत मी संबंधितांना शिफारस करणार आहे.

 

□ प्रातिनिधिक स्वरुपात गृहकर्जाचे वितरण

यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांच्या गृहकर्जाच्या धनादेशांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रति एक लाख 92 हजार रुपयांचे धनादेश 10 लाभार्थ्यांना देण्यात आले.
प्रारंभी स्वागत रेनगर फेडरेशनचे सचिव युसूफ मेजर यांनी केले. सूृत्रसंचालन अ‍ॅड. अनिल वासम यांनी केले तर आभार फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबर्गुी यांनी मानले.

 

कार्यक्रमास विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी तसेच म्हाडा, वीज वितरण कंपनी, जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी, रे नगर फेडरेशन चे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

Tags: #Demand #declaration #municipality #Raynaga #GuardianMinister #asked #MLA #Kalyanshetty #boat #NarsayyaAdam #Solapur#रेनगर #नगरपालिका #घोषित #मागणी #पालकमंत्री #आमदार #कल्याणशेट्टी #बोट #नरसय्याआडम
Previous Post

पालकमंत्री विखे – पाटील यांची सोलापुरात गाडी अडवण्याचा प्रयत्न

Next Post

एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र… तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र… तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र... तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697