मोहोळ : १३ वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या नाववरील कुरुल ( ता. मोहोळ ) येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी केल्या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात पाच जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Purchase of land in the name of deceased woman by creating fake documents, case filed against five people, Mohol
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरुल येथील वनमाला विठ्ठलराव गोळे यांच्या नावावर कुरुल येथील गट नं ९९२ मध्ये पाच हेक्टर ४८ आर येवढी जमीन आहे. या जमिनीची खरेदी २ ऑगस्ट २०२२ रोजी व्यवहार करण्यात आला. वस्तूत: वनमाला गोळे या २४ सप्टेंबर २००९ रोजी तेरखेडा ( ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद) येथे मयत झाल्या आहेत. याची माहिती असून सुद्धा त्यांच्या जागी दुसरी महिला उभी करून तिचे बनावट आधार कार्ड तयार करून सदर जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली.
१३ वर्षापूवी मयत झालेल्या वनमाला गोळे यांचे वारसदार विशाल गोळे यांनी आपली व शासनाची फसवणूक झाल्याने महेश मोहन जाधव (रा . देवळे ता. सांगोला ) व खरेदी खतातील साक्षीदार आबासाहेब सुधाकर पवार (रा. अंकोली ता. मोहोळ) व दत्तात्रय हणमंत सुरवशे (रा. रांझणी ता. पंढरपूर) एक अनोळखी महीला व एक एजंट दलाल अशा पाच जणावर मोहोळ पोलिस ठाण्यात भादवी ४२० ४६५ ४६८ ४७१ ३४ व सहकलम ८२ नोंदणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद मोहोळचे दुय्यम निबंधक धनंजय गोरे यांनी दाखल केली. यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. मयत वनमाला गोळे यांचे वारस बाहेरगावी राहतात याची माहिती घेवून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात गुप्तांग कापून निर्घृण खून
सोलापूर : सोलापुरात एका अज्ञात व्यक्तीकडून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना काल शुक्रवारी (ता. 13 ) रात्री २ च्या सुमारास उघडकीस आली.
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनामूळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगोला शहरातील एखतपूर- आचकदाणी रोडवर हा प्रकार उघडकीस आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुकाराम इंगोले (वय ३४, रा. एखतपूर) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे कर्मचारी एखतपूर ते अचकदाणी रोडवर शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आचकदाणी रोड लगत एक तरुण मृत अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता सदरचा प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हा खून कोणाकडून करण्यात आला आहे, आणि का केला आहे हे अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.