सोलापूर : सोलापुरात 70 फूट रोड परिसरातील चिप्पा मार्केट येथे एका युवकाचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. काल रविवारी (ता. 15) अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केटमध्ये सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात ही घटना उघडकीस आली होती. आज त्याचा तपास लागला असून मित्राने खून केला असून त्यास पोलिसाने ताब्यात घेतले. Chippa Market Murder Case: The identity of the deceased is known, the childhood friend killed the friend
चिप्पा मार्केटमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास वेगात सुरू आहे. चिप्पा मार्केट येथील खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. बबलू सिकंदर हुंडेकरी (वय 35, रा. पद्मा नगर मस्जिदजवळ, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी बसवराज रविंद्र आतनुरे याला अटक केली आहे. मयत बबलू आणि संशयित आरोपी बसवराज हे दोघे एकाच परिसरात राहतात. हे दोघेही लहानपणापासून मित्र आहेत. काल रविवारी सकाळी चिप्पा मार्केट या ठिकाणी बबलूचा मृतदेह सापडला होता. डोक्यात फरशी घालून त्याचा खुन केल्याचे उघडकीस आले होते.
घटना कळतात जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत युवकाचा ओळख पटली नसून अंदाजे ३५ – ४० वर्षाचा तरुण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. आज मयताची ओळख पटल्यानंतर संबंधित नातेवाईकांना बोलविण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बबलूचा खून का कशासाठी केला याबाबतची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने पोलिस तपास करीत असल्याचे सांगितले.
भाजी विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चिप्पा मार्केट परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनास्थळी मयत तरुण हा निपचित पडला होता. त्याच्या अंगावर मोठा फरशीचा तुकडा त्याच्या जवळच पडला होता. रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, घटनेची माहिती करतात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मृताच्या डोक्याजवळ अंदाजे २० ते २२ किलो वजनाची फरशी रक्ताने माखलेली आढळली. कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याने मयताचा चेहरा ओळखू येत नव्हता. पोलिसांनी श्वान पथकाद्वारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पथकातील श्वान काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळत राहिला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले.
मयताच्या अंगावर लाल रंगाचे बारीक फुले असलेला पोपटी शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. त्याच्या उजव्या हातावर गोंदलेले अस्पष्ट खुण आहे. या संदर्भात कोणास माहिती असल्यास त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक चिंताकिंदी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.
महानगरपालिकेच्या या चिप्पा मार्केट मधील बरेच भाजी विक्रेते आणि इतर व्यापारी मार्केटमध्ये न बसता सत्तर फूट रोडवर व्यवसाय करतात. त्यामुळे या मार्केटमध्ये नेहमी शुकशुकाट असतो.रात्रीच्या वेळी मात्र या ठिकाणी व्यसनी लोकांचा वावर असतो. त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा होती. जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने आजूबाजूच्या सर्व परिसरात या संदर्भात माहिती दिली. तसेच मार्केटमधील बागवान कुरेशी यांनाही यासंदर्भात माहिती विचारली. परंतु त्या युवकाची काल रात्रीपर्यंत ओळख पटलेली नव्हती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पैशाच्या व्यवहारावरून चाकूने भोसकले
पंढरपूर – जुन्या पैशाच्या व्यवहारातून तरुणास लाथाबुक्याने मारहाण करून पोटात चाकू खूपसल्याची धक्कादायक घटना संक्रांती दिवशी घडली.
याप्रकरणी बबलू प्रक्षाळे, सोमनाथ खंकाळ, विक्रांत माने व दोन अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उमेश सुखदेव खाडे रा.आढीव यांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी की उमेश खाडे याचा बबलू प्रक्षाळे बरोबर आर्थिक व्यवहार होता. तो त्यांनी काही दिवसापूर्वीच पूर्ण देखील केला होता.
मात्र यानंतर देखील बबलू वारंवार त्याच्याकडे पैशाची मागणी करीत होता. यावरूनच रविवारी (दि. 15) बबलू याने उमेश यास भटुंबरे नजीक बोलावून घेतले. उमेश व त्याचा मित्र सोमनाथ सलगर हे दुचाकीवरून जात असताना विक्रांत माने याने त्यांची दुचाकी अडवली तर सोमनाथ खंकाळ याने त्याच्या छातीत दगड घातला. यावेळी उपस्थित असलेल्या दोघांनी लाथा बुक्क्याने मारहाण केली तर बबलू याने हातातील चाकू उमेशाच्या पोटात खूपसला तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीदेखील दिली.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बबलू प्रक्षाळे, सोमनाथ खंकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करत आहेत.
वाळूच्या पैशावरून वाद झाल्याच्या बातम्या प्रसारित झाले आहेत. मात्र या एफआयआरमध्ये वाळूच्या पैशाचा कुठेही उल्लेख फिर्यादीने केला नाही. वाळूच्या पैशातून हवा झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.