सोलापूर : सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानचे वतीने देण्यात यंदापासून नवा उपक्रम सुरू केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, कृषी सहकार, महिला जागृती तसेच भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजत्यांनो स्व. पै खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार देण्यात येणार आहे. Brahmadevdada Mane Pratishthan’s new initiative, self for athletes. Pai Khashaba Jadhav Sports Award Sarathi Foundation Talent Search Exam यासाठी संस्था, व्यक्तीनी योग्य माहितीसह प्रस्ताव ५ फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात अंत्यत प्रतिष्ठेचे समजले जाणारे व देखण्या आयोजनात देण्यात येणाऱ्या मा. ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानचे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींसाठी कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तीसाठी छत्रपती राजर्षी शाहू सामाजिक पुरस्कार, शेती अथवा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तीसाठी महात्मा फुले कृषी सहकार पुरस्कार, महिला – क्षेत्रात जनजागृती व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला संस्था, महिला व्यक्तीसाठी मातोश्री कै. सौ. सुमित्रादेवी माने महिला जागृती पुरस्कार तसेच यावर्षीपासून नव्याने क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, खेळाडूसाठी स्व. पै. खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
५ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक माहिती, संदर्भासह प्रस्ताव ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक सिध्देश्वर पेठ जिल्हा परिषद समोर सोलापूर या कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावासंदर्भात त्या- त्या क्षेत्रातील तज्ञाकडून संस्थाची, व्यक्तीची निवड करण्यात येईल तरी जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, ‘कृषी सहकार, महिला जागृती व क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांनी आवश्यक माहितीसह प्रस्ताव वेळेत पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात ‘मास लीडर टॅलेंट सर्च परीक्षे’ चे आयोजन, मोफत नोंदणी
सोलापूर : ‘मनुष्यनिर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे घोषवाक्य घेऊन आपली वाटचाल करणाऱ्या फाउंडेशनच्या वतीने मार्च महिन्यामध्ये बोर्ड परीक्षा झाल्यानंतर दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी ‘मास लीडर टॅलेंट सर्च परीक्षे’ (MLTSE) चे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बुरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. बुरा पुढे म्हणाले, ‘मास लीडर’ म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास साधून जीवनात उत्तुंग यश संपादन करणे आणि मोठ्या जनसमुदायाचे प्रेरणास्थान बनणे. ‘मास लिडर’ बनण्यासाठी आपले उपजत दोष कमी करत चांगले गुण, सवयी, कौशल्य विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. ‘मास लीडर’ घडण्यासाठी, घडविण्यासाठी एक चळवळ उभा करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. समाजातील आणि एकंदरीत देशातील जास्तीत जास्त लोकांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाल्यास आणि त्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळविल्यास आपोआप आपला भारत राष्ट्र विकसित होईल, समृद्ध होईल.
‘मास लिडर टॅलेंट सर्च् परीक्षा’ (MLTSE) पूर्णपणे मोफत असून निवड प्रक्रिया प्रथम फेरीत लेखी परीक्षा व द्वितीय फेरीत तोंडी परीक्षा / मुलाखत असे स्वरूप आहे. बक्षीसांचे स्वरूप प्रथम बक्षीस रुपये 20000, द्वितीय बक्षीस रुपये 15000, तृतीय बक्षीस रुपये 10000, उत्तेजनार्थ 50 बक्षीसे प्रत्येकी रुपये 500 आहे. याशिवाय निवडक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पाच वर्षांसाठी प्रति वर्ष रुपये 10000 शिष्यवृत्ती सुद्धा देण्यात येणार आहे.
परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, वर्णनात्मक प्रश्न असतील. बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, कल्पनाविस्तार, लेखन कौशल्य इत्यादींवर आधारीत ही परिक्षा असेल. या परिक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी अशोक भांजे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://forms.gle/BLnG73zn42XZZ6sk6 या गुगल लिंकद्वारे फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी, अधिक माहितीसाठी 9420488991 व 8484090198 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीनिवास बुरा यांनी पत्रकार परिषदेत यांनी केली आहे.