सोलापूर : दोन गटात झालेल्या वादातून एका बाहेर राज्यातील कामगाराचा धारधार हत्याराने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 19) दुपारी घडली आहे. हा प्रकार पैशावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत बिहारी तर आरोपी उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे. Argument between two groups in Gadda yatra of Solapur; One killed due to exchange of money Bihari Uttar Pradesh
शहरात ग्रामदैवत श्री सिध्देश्वरात मंदिर परिसरात यात्रा भरलेली आहे. या यात्रेत शेकडो व्यावसायिकांचे स्टॉल लागलेले आहेत. आज दुपारी दोन गटात झालेल्या वादातून एका तरूणाचा खूनाची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच सदर बाझारचे पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनेनंतर आरोपीने पळ काढल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.
या यात्रेत आठ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून काही नागरिक आणि पीडित यांच्यात वादादवादी झाली. या वादावादीचे हाणामारीत पर्यावसन झाल्याचे प्रथमदर्शनी लोकानी सांगितले. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गड्डा यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मार्केट पोलीस चौकीच्या समोरील बाजूस दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी तिघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. शहरातील मार्केट पोलीस चौकीसमोरच ही घटना घडली. मयत बिहारी तर आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत. आरोपीचे नाव आतिफ अख्तर शहा (रा. जि. कैमुर रा. बिहार) असे आहे.
मयत तरुणाचा मृतेदह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सर्व पीडित आणि जखमी मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत असून याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
□ अपहरण प्रकरणी आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी
सोलापूर : लग्नाच्या आमिषाने मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपी कोडग्या हरकून काळे (वय 32, रा. मोहोळ) याला जिल्हा न्यायाधीश कविता शिरभाते यांनी दोन वर्षे दहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
13 जानेवारी 2016 रोजी सकाळी पिडीतेची आई शेळ्या घेवून चरण्यासाठी गेली होती. त्यावेळी पिडीता एकटीच घरी होती. संध्याकाळी शेळ्या घेवून पिडीतेची आई घरी आली. त्यावेळेस पिडीता घरी दिसली नाही. शेजारी व नातेवाईकाकडे चौकशी केली असता पिडीता मिळून आली नाही. काही दिवसानंतर पिडीता ही आरोपीकडे असल्याचे कळल्याने फिर्यादी ही आरोपी हा जवळचा नातलग असल्याने त्याच्यागावी जावून तिची भेट घेतली. तेव्हा आरोपीने तिला गोड बोलून तुझ्याबरोबर लग्न करतो असे आमिष दाखवून तिला गाडीवर नेऊन तिच्याशी जबरदस्ती केली. त्यामुळे फिर्यादीने कामती पोलिसात गुन्हा दाखल केला.
आरोपी फरार असल्यामुळे तपासी अंमलदाराने न्यायालयात सी.आर.पी.सी. 299 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर तपासी अंमलदारास आरोपी हा दुसर्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे कळाल्याने त्यास या गुन्ह्यात वर्ग करून त्याच्याविरुध्द पुरवणी दोषारोपपत्र पाठविण्यात आले. यात फिर्यादीची आई, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे यामध्ये पिडीतेने सरकारपक्षास सहाय्य केले नाही.
यात आरोपीने फिर्यादीस गोड बोलून फुस लावून लग्नाचे आमिष देवून त्याच्या गाडीवर नेल्याचा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे साक्षीपुराव्याद्वारे करण्यात आला. तो युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी आरोपी कोडग्या काळे यास त्याने आजपर्यंत भोगलेला तुरुंगवास म्हणजे 2 वर्षे 10 महिने 14 दिवसांची शिक्षा दिली. पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कमपिडीतेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यात सरकारतर्फे अॅड. प्रकाश जन्नु व आरोपीतर्फे अॅड. राजेंद्र बायस यांनी काम पाहिले.