Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जयहिंद साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टर – दुचाकीचा; एक जण ठार दोन गंभीर जखमी

Tractor - two wheeler in front of Jaihind Sugar Factory; One person killed and two seriously injured in Achegaon

Surajya Digital by Surajya Digital
January 19, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
जयहिंद साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टर – दुचाकीचा; एक जण ठार दोन गंभीर जखमी
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद साखर कारखान्यासमोर झालेल्या भीषण अपघातात एक ठार दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात शिवाप्पा जमादार – कोळी जागीच ठार झाले आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झाले. Tractor – two wheeler in front of Jaihind Sugar Factory; One person killed and two seriously injured in Achegaon

 

शिवप्पा जेटेप्पा जमादार (वय ५०, सध्या रा.
आर्य चाणक्यनगर, जुळे सोलापूर असे)  या अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर मरेप्पा अमृत कोळी (वय ५५) व श्रीधर शिवप्पा जमादार (वय २५) हे जखमी झाले आहेत. मयत शिवप्पा जट्टेप्पा जमादार हे कुसूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.

 

शिवाप्पा  व त्यांचा मुलगा हे दोघे जण कामानिमित्ताने तिलाटी गेटकडून आचेगांवकडे निघाले होते. दरम्यान रस्तालगत शेती असल्याने तेथे उभे असलेले मरेप्पा अमृत कोळी यांच्यासोबत बोलत उभे असताना जयहिंद शुगर कारखान्यातून येणारा ट्रॅक्टर त्याचा क्रमांक MH13 DE4686 याट्रॅक्टरने समोरून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक जण ठार झाले आणि दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना तिलाटी गेटच्या अलीकडे कोंत्यव्वा नगरच्या दरम्यान च्या ठिकाणी घडली.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या इंजिनच्या समोरच्या चाकाखाली दुचाकी अडकली. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातील ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. जय हिंद शुगर कारखान्यामुळे येथे वाहनांची वर्दळ वाढली असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचेही दिसून येते आहे.

 

मागील काही महिन्यांपूर्वी आचेगावचे माझी सरपंच‌ माशाळे यांचा अपघातात मृत्यू झाला होता.सदरची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

》 विठ्ठल दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, एक ठार , 35 जखमी

मंगळवेढा : पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने ही बस निघाली होती. चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बसला अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे. चालकावर गुन्हा दाखल झाला असून अटक केलीय.

हा अपघात  बुधवारी ( ता. 18) झाला. मंगळवेढ्याजवळ बसला हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पूर्णपणे पलटी झाली आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य झाले. अतिवेगाने व निष्काळजीपणे लक्झरी बस चालवून पलटी करुन भावीक, महिला रामकुंवरबाई भूपतसिंह गुज्जर (वय 68 रा.मोहनगड,मध्यप्रदेश) हिच्या मृत्यूस व ट्रॅव्हल्समधील 35 भाविकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी चालक चंद्रकांत रामगोपाल उच्चार्या (रा.मिर्झापूर ग्वालियर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी हणविरसिंह भूपतसिंह गुज्जर (वय 30) हा मयत आई व इतर जखमी भाविक मध्य प्रदेशमधून विजापूर – मंगळवेढा मार्गे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना आज बुधवारी (दि.18) सकाळी 6 वाजता जयभारत टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी (बस नं. यू.पी. 80 एफ. टी.8283 ) चालक चंद्रकांत उच्चार्या याने लक्झरी बस हयगयीने भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली.

 

वाहन रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी करुन फिर्यादीची आई रामकुंवरबाई गुज्जर (वय 68 ) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच अक्का ओझा (वय 60), मानसिंह राठोड, पार्वती गुज्जर (वय 60),सेफकुमारी शर्मा (वय 50), सरोज लोधी (वय 50), सरचनी कुमार कुशवाह,ढिला सिंग (वय 60), रामलाल (वय 65), महाविर राठोड ( वय 76), मुन्नीदेवी (वय 64), राजबाई राठोड (वय 50),खुवाज सिंग (वय 50), नाथूराम (वय 60), सुमेश कुशवाह (वय 25), रामचरण कुशवाह (वय 65), पुरणलाल ओझा (वय 60), रामनिवास राठोड (वय45), धिरजसिंग ओझा (वय 63),बाबुलाल राठोड (वय 70), सिताराम राठोड (वय 71),गोलकुमार कुशवाह (वय 33), मुन्नीबाई कुशवाह (वय 40),रामगोपाल चंदल (वय 40),मुन्नीदेव चंदल,गब्बलाल कुशवाह (वय70), गुलाब गजराम (वय 45),सुलतान पारेहा (वय 50),लिलाबाई कुशवाह (वय 60),गुलाबाई कुशवाह (वय 40), कुमारीबाई राठोड (वय 50), कस्तुरी राजदूत (वय 50),अशीर कुशवाह (वय 50),कुमान सिंह (वय 55),नाथीयाबाई सिंह (वय 55),सुमीकुमार कुशवाह (वय 17) आदी 35 भाविकांना या अपघातात जखमी झाले.

 

यामधील काही भाविक मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात, सोलापूर येथील शासकीय रुग्णालय व अन्य खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. हा अपघात विजापूर ते पंढरपूर जाणार्‍या मार्गावरील मंगळवेढा हद्दीतील डिकसळ गावचे शिवारात येड्राव फाट्याच्या जवळ झाला आहे. दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी विविध ठिकाणी दाखल केले.

याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे हे करीत आहेत. या अपघातामध्ये बाहेरील राज्यातील भाविक जखमी झाल्याने मंगळवेढा तालुक्यात दिवसभर अपघाताविषयी चर्चा होत होती. मोठ्या प्रमाणात अपघातात भाविक जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Tags: #Tractor #twowheeler #front #Jaihind #SugarFactory #One #person #killed #two #seriously #injured #Achegaon#जयहिंद #साखर #कारखाना #ट्रॅक्टर #दुचाकी #एकजण #ठार #दोन #गंभीर #जखमी
Previous Post

सोलापूरच्या गड्डा यात्रेत दोन गटात वाद; पैश्याच्या देवाण – घेवाणवरून एकाचा खून

Next Post

भर दुपारी गड्डा यात्रेत युवकाचा भोसकून खून; तीनजण गंभीर जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भर दुपारी गड्डा यात्रेत युवकाचा भोसकून खून; तीनजण गंभीर जखमी

भर दुपारी गड्डा यात्रेत युवकाचा भोसकून खून; तीनजण गंभीर जखमी

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697