□ इंटरनेट चालू असल्याने दोनच तासात आरोपी पोलीसांच्या जाळ्यात
सोलापूर : पैशाच्या कारणावरून सोलापूरच्या गड्डा यात्रेत बिहारी युवकाचा तीक्ष्णहत्या-याने भोसकून खून केल्याची खळबळ जनक घटना आज गुरूवारी ( दि.१९) दुपारी मार्केट पोलीस चौकीच्या समोरील चौकात घडली. Youth stabbed to death during Gadda Yatra in the afternoon; Three seriously injured Solapur Uttar Pradesh Bihar
सिद्धेश्वर यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या गड्डा यात्रेला यंदा खून मारामारीचे गालबोट लागले आहे. गुरुवारी भर दुपारी साडेतीन – चार वाजण्याच्या सुमारास दोन व्यापाऱ्यांमध्ये किरकोळ पैशाच्या कारणावरून भांडण होऊन त्याचे पर्यावसन होत एकाचा जागेवरच भोसकून खून करण्यात आला. तर भांडणे सोडवण्यास गेलेल्या तिघांवर हत्यारांनी वार करून मारेकरी क्षणार्धात पसार झाले. अतिशय गर्दीच्या ठिकाणी हा खून झाल्याने यात्रेत आलेल्या नागरिकात एकच पळापळी झाली.
अतिफसाह अख्तरसाह (वय-२१,रा.डुमरी, कबीलासपूर दुर्गावती जि.कैम्हुर, बिहार) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून या भांडणात तबरेजसाह इस्तीयाक मौलाना साह (वय – ३२.रा. फकराबाद कुदारा जि. कैम्हुर, राज्य-बिहार) आदिलसहा अयाजसाह (वय-१८, रा. डुमरी कबीलासपूर,जि. कैम्हुर,राज्य – बिहार) व परवेशसाह समृद्धीसाह (वय-३२,रा. डुमरी,कबीलासपूर दुर्गावती,कैम्हुर,बिहार) अशी जखमींची नावे आहेत आहे.
याबाबत घटनेची हकीकत अशी की, श्री सिद्धेश्वर यात्रेत दरवर्षी गड्डा यात्रा भरली जाते. तब्बल महिना एक महिनाभर या यात्रेत महाराष्ट्र बाहेरील, उत्तर प्रदेश, बिहार कर्नाटका येथील छोटे – मोठे व्यापारी आपल्या वस्तू विकण्याकरिता सहभागी झालेले असतात.
या यात्रेत गेल्या अनेक वर्षापासून उत्तर प्रदेश, बिहारचे युवक वेगळे स्टॉल घेऊन आपली दुकाने थाटत असतात. मागील दोन वर्षी कोरोनामुळे सिद्धेश्वरची गड्डा यात्रा भरली नव्हती पण यंदा मात्र गड्डा यात्रा मोठ्या प्रमाणात भरली. खून झालेला युवक आपल्या दहा-बारा सवंग-सवंगड्यासह बिहार वरून घड्याळ विक्री करण्यासाठी आला होता. यात्रेत त्याचे घड्याळाचे दुकान होते तर मारहाण करणाऱ्या युवकाचा कपड्याचा स्टॉल होता. विशेष म्हणजे दोघांचेही दुकाने जवळजवळ आहेत.
त्याने मयत आतिफसाह यास ५ हजार रुपये तीन-चार दिवसांपूर्वी उसने दिले होते. पैशाच्या देण्याघेणावरून रात्री या ठिकाणी भांडणे झाली होती. आज पुन्हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पैसे मागितले असता पैसे न दिल्याने मारेकर्यांनी हातातील तीक्ष्ण हत्यारांनी आतिफसाह याला दुकानासमोरील रस्त्यावरच भोसकले. घाव छातीतून आरपार गेल्याने आसिफसाह जागेवरच कोसळून रक्ताच्या थारोळ्यात पडला. बाकीचे तिघे सोडविण्यास गेले असता त्यांनाही मारून या दोघा तिघांनी तिथून पोबार केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, मारणारे तिघे चौघे होते. घटना घडली तेव्हा थोड्याशा अंतरावरील दुकानात याबद्दल कोणतेही खबर नव्हती. ही घटना कळताच फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. तसेच सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर हेही त्या ठिकाणी दाखल झाले. काही वेळाने शासकीय वस्ती शासकीय रुग्णालयातून लादेन हे ॲम्बुलन्ससह त्या ठिकाणी दाखल झाले. घटनेची प्राथमिक माहिती घेऊन मृतदेह उत्तरे तपासणी करता शासकीय रुग्णालयाकडे पाठवले. जखमींना उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
□ आरोपीचा इंटरनेट चालू असल्याने पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
खून करून पळून जाताना संशयित आरोपी अक्कलकोटमार्गे वागदरी गुलबर्गाकडे जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने शिरशी या गावाजवळ अवघ्या दोन तासात पकडले. संशयित आरोपींकडे मोबाईल होते. सायबर कक्षाच्या मदतीने आरोपीचा इंटरनेट चालू असल्याने ते सहज जाळ्यात घावले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोरगे व पोलीस निरीक्षक संदीप क्षीरसागर यांच्या मार्गशाखालील पथकाने ही कामगिरी बजावली. प्रथम चौकशीत चारही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी सुराज्यशी बोलताना सांगितले.
□ शेकडो दुकाने आहेत पण सीसीटीव्ही नाही
या ठिकाणी शेकडो दुकाने आहेत परंतु काही काही दुकानातच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. घटना घडल्याच्या आसपास दुकानात सीसीटीव्ही फुटेज आहेत का याची तपासणी पंचनामा करताना पोलिसांनी केली. परंतु त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसला. घटना घडली तिथे सीसीटीव्ही नव्हते.
गेल्या पाच सहा वर्षात सोलापूर शहरात युपी बिहार मधील अनेक युवक कामाच्या निमित्ताने शहरातील अनेक ठिकाणी पसरलेले आहेत. त्यातील काही कष्टाळू आहेत. तर काही असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या घटनेमुळे शहराची व गड्डा यात्रीची बदनामी झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.