सोलापूर : आर्थिक व्यवहारातून श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेत तरुणाचा चाकूने भोसकून खून करून अक्कलकोट मार्गे कर्नाटकात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणारे पाच संशयित आरोपी यांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केले. Five accused in Solapur Gadda yatra murder case in police custody Uttar Pradesh Bihar
या पाच संशयित आरोपी यांना कोर्ट एन.एम. बिराजदार यांच्या न्यायालयात उभे केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेची हकीकत अशी की, १९ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास गड्डा यात्रेत मृत आतिफ अक्तार साह (वय-२१) याने संशयित आरोपींकडून पैसे उधार घेतले होते. त्या पैशाच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर खुनात झाले. संशयित आरोपी हे पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकांनी दोनच तासात त्यांना पकडले.
याप्रकरणी मयताचे नातेवाईक परवेज साह यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खून प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी नौशाद ऊर्फ झेन मुस्ताक अहमद कादरी (वय-२५,रा. झमझम चाळ,रूम नंबर ०५ बनेली दर्गा जवळ, डॉ.आंबेडकर चौक जवळ, बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण (चाकु मारणारा), दिलशाद ऊर्फ गुलशाद शमशाद खान (वय-२४,रा. पाकुडे चाळ, सिराज म्हशींचा तबेल्या समोर, जाफर शेख यांचे घरात भाड्याने बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण, अरविंद ऊर्फ बिट्टू कृष्णा सिंह ऊर्फ सिन्ह (वय-४४,रा.डॉ. आंबेडकर नगर, ए/७ बिल्डींग, न्यु म्हाडा कॉलनी समोरील झोपडपट्टी, सायन कोळी वाडा,मुंबई, इब्रार इस्तीकार खान (वय-२५,रा.रूम नंबर ५/६, पाकुडे चाळ, दर्गा रोड बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण,एरार ऊर्फ कल्लु इस्तकार खान (वय-२१) या पाच आरोपींना न्यायालयात हजर केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
न्यायाधीश बिरादार यांनी पाचही संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.यात सरकार पक्षातर्फे संतोष पाटील यांनी तर आरोपीतर्फे ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. प्रवीण पगारे, मुंबई यांनी काम पाहिले.
□ चिप्पा मार्केट खून प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी
सोलापूर : शहरातील अशोक चौकात असलेल्या
चिप्पा मार्केट येथे युवकाच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत २१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली होती. कोठडी संपल्याने शनिवारी (ता. 21) आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश प्रशांत वराडे यांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.
बबलू हुंडेकरी या आपल्या मित्राचा बसवराज अतनुरे (रा. पद्मा नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याने डोक्यात फरशी घालून खून केला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. देवमाने तसेच विधी अधिकारी ॲड. किणगी यांनी काम पाहिले.