● भीमा केसरी किताबासह ९ लाखाची बक्षिसे
विरवडे बु : खासदार धनंजय महाडिक यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून मंगळवार, दि. २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भीमा साखर कारखाना टाकळी – सिंकदर येथे भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली. Pandharpur Sikandar Takli Dhananjay Mahadik won the grand final at the Bhima factory workplace on Tuesday
चेअरमन महाडीक म्हणाले की , राज्यातील मातब्बर पैलवान या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. या कुस्त्याच्या आखाड्यासाठी एकूण ९ लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ‘भीमा केसरी ‘या किताब साठी पै.सिकंदर शेख, महान भारत केसरी विरूध्द पै.भूपेंद्रसिंग अजनाला पंजाब केसरी, भीमा साखर केसरी या किताबसाठी पै.माऊली जमदाडे महान भारत केसरी विरूध्द पै. बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी,भीमा कामगार केसरी या किताबसाठी पै.गणेश जगताप मुंबई महापौर केसरी विरूध्द पै.अक्षय शिंदे, भीमा वाहतूक केसरी या किताबसाठी पै.महेंद्र गायकवाड विदर्भ केसरी विरूध्द पै.गोरा अजनाला पंजाब युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल चॅम्पियन,भीमा सभासद केसरी या किताबसाठी पै.अक्षय मंगवडे नॅशनल गोल्ड मेड्लिस्ट विरूध्द पै.संतोष जगताप वस्ताद दत्ता आप्पा वाघमारे अकलूज अशा निकाली कुस्ती होणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यासाठी भीमा केसरी भव्य ‘निकाली कुस्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भीमा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वस्ताद म्हणून पै. दीनानाथ सिंग -हिंद केसरी, पै. राम सारंग -राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते,पै.अफसर शेख ऑल इंडिया चॅम्पियन, पै.रावसाहेब मगर, पै. छोटा रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी, पै. मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी, पै.समाधान घोडके महाराष्ट्र केसरी, पै. मौला शेख उप – महाराष्ट्र केसरी, पै. योगेश बोंबाळे महान भारत केसरी, पै.भरत मेकाले उप – महाराष्ट्र केसरी, पै.अन्सार शेख महाराष्ट्र चॅम्पियन, पै. सर्जेराव चवरे सोलापूर जिल्हा तालीम उपाध्यक्ष, पै.कुस्तीसम्राट अस्लम काझी, पै. भिवा शेंडगे,पै.समाधान पाटील मुंबई महापौर केसरी, पै. आसिफ शेख -सोलापूर केसरी, पै.महादेव चव्हाण सुस्ते, पै.सत्यवान घोडके,पै.समाधान लोमटे, पै.जमीर मुलाणी, पै.विलास तिरवे, पै.आण्णा शेंडगे, पै. आबादेव पुजारी, पै.चंद्रकांत काळे, पै. मारूती माळी, पै. महेंद्र देवकते, पै. भिमराव मुळे, पै. गणेश वाघमोडे, पै. सिद्राम मदने, पै. संजय बाबर, पै. सुधाकर गायकवाड, पै. महादेव येळे हे प्रमुख वस्ताद उपस्थित राहणार आहेत.
कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी पै. शरीफ शेख ९९२१७४५५७७/ ८०८०९०१०३१ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे. या भव्य निकाली कुस्त्यासाठी निवेदक म्हणून धनाजी मदने , अशोक धोत्रे हे काम करणार आहेत .