पुणे : बेळगाव आम्हाला द्या व विषय संपवा, असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे या रुग्णालयाचे चेअरमन प्रभाकर कोरे बेळगावचे आहेत. बेळगाव नको, अख्खा कर्नाटक घ्या, आम्ही आधी मुंबई प्रांतातच होतो, असे कोरे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यावर पूर्ण कर्नाटक नको, फक्त बेळगाव हवे, अशी मिश्किल टिप्पणी पवारांनी केली. Just give Belgaum and end the matter : Sharad Pawar Prabhakar Kore Pimpri Chinchwad
पुण्यातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवारांनी हजेरी लावली होती. या रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे हे बेळगाव येथे वास्तव्याला आहेत. यावेळी डॉ. कोरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ‘शरद पवार कायम बेळगाव कधी देणार, अशी विचारणा करत असतात. त्यावर मी त्यांनी म्हटले की, बेळगावच कशाला संपूर्ण कर्नाटकच घेऊन टाका, असे डॉ. कोरे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना ‘शरद पवार यांनी तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा’ अशी टिपण्णी केली. त्यांच्या या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्या हे प्रकरणावरील दोन्ही राज्यातील वाद थांबला आहे. मात्र, कर्नाटकातील बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचा चंग महाराष्ट्रातील नेत्यांनी बांधला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांच्या बेळगावातील एका मित्राला मिश्किल टिप्पणी करत मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा असं म्हटलं आहे. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.
एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण भोसरी इथे उपस्थित राहिलो. केएलई ही कर्नाटकमधील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचा जन्म काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याने केला. सात शेतकर्यांनी एकत्र येऊन सामाजिक ऋण फेडण्याची भूमिका घेऊन या संस्थेची स्थापना केली. pic.twitter.com/5i3RXnxqx1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 21, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पिंपरी चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाचे अध्यक्ष प्रभाकर कोरे हे मुळचे बेळगावचे असून ते शरद पवारांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभाकर कोरे यांनी म्हटलं की, शरद पवार सतत बेळगाव कधी देणार, साहेब आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो, घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, बेळगाव नको.
प्रभाकर कोरे यांचा हाच धागा पकडत शरद पवारांनीही यावर मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, प्रभाकर कोरे यांनी नवीन काही केले की ते मला उद्घाटनाला बोलावतात. मग ते कर्नाटकमध्ये असो की महाराष्ट्रात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. म्हणून मी नेहमी डॉ. प्रभाकर यांना सांगतो की, मी तुमची इतकी उद्घाटने केली. मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका. पण ते नेहमी सांगतात की अख्खा कर्नाटक तुम्ही, पण बेळगावची मागणी करू नका.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर कोनगोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 48 तासांत हिंसाचार थांबला नाही तर राष्ट्रवादीसहित इतर पक्षातील नेते बेळगावात जातील, असं वक्तव्य करत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट कर्नाटकातील डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी केल्यामुळं त्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे