मुंबई : अखेर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीची घोषणा केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. Balasaheb Ambedkar – Uddhav Thackeray announces alliance; Sharad Pawar will also join Bhimshakti Shivshakti यानंतर शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. पवार यांच्याशी माझे मुद्याचे भांडण आहे, हा वैचारिक वाद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच काँग्रेसने आपली निवडणूक रणनिती बदलायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
अखेर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी हे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित नव्हते. मात्र शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याने याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर होईल, असा अंदाज आहे. लवकरच महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमधील जागावाटप जाहीर केले जाणार आहे.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीचे औचित्य साधून या युतीची घोषणा करण्यात आली, असे ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी ठाकरे गट आणि वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत हेही उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले.
ठाकरे गटाशी आज वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदींनी स्वतःच्या पक्षातील नेतृत्व संपवले आहे, केंद्रातील काही मंत्री आमचे फक्त फाईली घेऊन जायचे काम असल्याचे म्हणत आहेत, पण एक दिवस मोदींचीही सत्ता जाणार, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाहीत,’ असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#Shivshakti_Bhimshakti@Prksh_Ambedkar @OfficeofUT @AUThackeray @waglenikhil#म_मराठी#शिवशक्ती_भीमशक्ती#लोकशाही #संविधान pic.twitter.com/iBXYE1V8X7
— Dhanraj Garad (@dhanraj_garad) November 21, 2022
मागील दोन दिवसांपासून स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले सुतोवाच आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी त्याला दिलेला दुजोरा पाहता, ही युती होणार अशी अटकळ होती. अशात आज सोमवारी (23 जानेवारी) सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत या युतीबद्दल जवळपास खात्री वर्तवली होती. ‘शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.’ अशा प्रकारचे ट्विट राऊत यांनी केले होते.
दादरच्या आंबेडकर भवनात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. सुरुवातीला दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले, त्यानंतर शिवशक्ती – भीमशक्तीच्या एकत्र येण्याची गरज बोलवून दाखवत, राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक मान्यवर, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत. परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत.’
संविधानाचं पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चालले आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितले. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.