□ परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, त्यात गळीत हंगाम ही पुढे ढकलला
सोलापूर : जिल्ह्यात परतीच्या पाऊसाने काही तालुक्यात मुक्कामच ठोकला तर काही तालुक्यात रिपरिप सुरू ठेवली त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम पुढे ढकलला याचा परिणाम तोडणी पुर्वीच ऊसाला तुरे फुटल्याने ऊसाचे वजन घटण्याची शेतकऱ्यांनी चिंता वाटू लागली. Usaala Alai Tura; Do the options Farmers Sugar factory Gulit season Solapur weight
यामुळे साखर कारखान्यांनी वेळेत गाळप करण्यासाठी पाऊले उचलून चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गतवर्षी उजनी धरण परिसरात चांगला पाऊस झाला. परिणाम मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला नाही. त्यामुळे ऊस गळीत हंगाम लांबणीवर पडला. त्यामुळे परतीचा पाऊस व अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे फुटल्याने यंदा ऊसाचे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
तापमानातील बदल, हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचलेले पाणी, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता, चुकीचा लागवडीचा हंगाम यामुळे ऊसाला तुरे येतात. मुबलक प्रमाणात असणाऱ्या ऊसाचे क्षेत्र असल्याने यंदाचा हंगाम उन्हाळ्याच्या मध्यावर चालणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचा मुक्काम ऊसाच्या फडात काही काळ वाढणार आहे. यामुळे साखर कारखान्यांची धुराडी दिर्घकाळ पेटलेलीच दिसणार आहेत.
□ तुरे आल्याने वजनावर परिणाम
ऊसाला तुरे येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याची पाने अरूंद होवून पिवळी पडण्यास सुरुवात होते. पानांचे क्षेत्रफळ कमी होते. त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पोग्यामध्ये असणाऱ्या कोंबाची वाढ थांबून तुऱ्याची वाढ होवू लागते. आणि तुरा पोग्यामधून बाहेर पडतो. तसतसे कांड्यावरील डोळे फुटण्यास सुरुवात होते. याचा फटका ऊसाच्या वजनावर होतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापुरात साखर उताऱ्यात पिछाडीवर तर गाळपात आघाडीवर
□ सोलापूरने साखर उत्पादनात १ लाख कोटी क्विंटलचा ओलांडला टप्पा
सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्हा ऊस गाळप आणि साखर उत्पादनात राज्यात आघाडीवर असून कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे तर सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनाचा १ कोटी क्विंटल चा टप्पा ओलांडला असला तरी साखर उताऱ्यात मात्र अत्यंत पिछाडीवर आहे. साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.
चालू गळीत हंगामात राज्यात १०१ सहकारी व ९७ खाजगी अश्या एकूण १९८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.९ जानेवारी पर्यंत सोलापूर विभागातील ४७ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून साखर उतारा सरासरी ८.५६ टक्के इतका कमी आहे. तर कोल्हापूर विभागातील ३४ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन करीत सरासरी साखर उतारा १०.९५ टक्के आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अव्वल स्थानी आहे.
राज्यातील १९८ कारखान्यांनी ५७९.७० लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून ५६०.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४९ टक्के इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात २० लाख टनांनी ऊस गाळप जादा झाले असून साखर उताऱ्यात मात्र काहींशी घट झाली आहे. गतवर्षी याच दरम्यान ९.८२ टक्के इतका साखर उतारा होता.त्यातुलनेत यंदा साखर उतारा कमी झाला आहे.