□ सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
सोलापूर : सोन्याच्या बांगड्या कट करून चोरी करणारी सराफासह सातजणांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. The theft of gold bangles by cutting; Gang of seven including Sarafa jailed by Solapur Lohmarg Police
अजय सोमा जाधव (वय 29, रा. क्रांतीनगर झोपडपटटी, दमाणीनगर), लखन अशोक गायकवाड (वय 28, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं 4), नीलेश शंकर जाधव (वय 33, रा. सलगर वस्ती पोलीस ठाण्यासमोर, सोलापूर सध्या रा. हाउसिंग बोर्ड, शास्त्रीनगर अंबरनाथ) व सोनार कुशलसिंह जोधसिंह राव (वय 38, रा. रावमादडा झाडोली, उदयपूर राजस्थान सध्या रा. कोहोचगांव, अंबरनाथ पश्चिम), शुभम सुर्यवंशी, राहुल शिंदे (दोघे रा. हाउसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, अंबरनाथ जि. ठाणे), अमर शंकर जाधव (वय 35 रा. सलगरवस्ती सध्या रा. पिंगळेवस्ती, मुंडवा पासपोर्ट ऑफीसजवळ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या सातजणांची नावे आहेत.
फिर्यादी संतोष सौदागर नारायणकर (वय 42, रा. न्यू संजय नगर कुमठा नाका सध्या रा. विंग तोडमल अंगण, येवलेवाडी, कोंढवा पुणे) यांची आई सोलापूर ते गुलबर्गा प्रवास करण्याकरीता विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये जनरल बोगीत चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी दोन गुन्ह्यात सातजणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचे 10 तोळ्याची सोन्याची लगड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण तीन लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून चार गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.
ही कारवाई लोहमार्गचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहायक फौजदार संजय जाधव, प्रमोद सुरवसे, यशवंत जमादार, प्रसाद गायकवाड यांनी केली आहे.