Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Solapur court विवाहितेवर अत्याचार करून पैसे, दागिन्यांची लुट; तरुणाचा जामीन फेटाळला

Robbery of money, jewels by oppressing the married; rejects bail of youth

Surajya Digital by Surajya Digital
January 24, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
Solapur court विवाहितेवर अत्याचार करून पैसे, दागिन्यांची लुट; तरुणाचा जामीन फेटाळला
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर –  येथील एका विवाहित महिलेसोबत सोशल मिडियातुन ओळख निर्माण करुन तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या कडुन तब्बल २किल १७८ ग्रॅम सोने लुटुन बलात्कार केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणाचा जामीन अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी फेटाळला. Robbery of money, jewels by oppressing the married; Solapur court rejects bail of youth

 

याची थोडक्यात हकिकत अशी, श्रीधर श्रीनिवास रच्चा (वय ३२ रा. सोलापूर) या तरुणाने एका विवाहितेच्या फेसबुक अकाऊंटवर २०१९ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती.त्यास पिडितेने प्रतिसाद दिला नव्हता.तरीही रच्या याने वारंवार रिक्वेस्ट पाठवल्याने तिने ती स्विकारली, त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढुन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याचा गैरफायदा घेऊन तरुणाने काही फोटो, व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. तसेच विवाहितेकडुन वेळोवेळी एकुण १५ लाख १४ हजार रुपये आणि २ हजार१७८ ग्रॅम सोने घेतले होते. आणि तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.

 

त्याबाबत पिडितेने दिलेल्या फिर्यादी वरून फौजदार चावडीच्या पोलीसांनी श्रीधर रच्या याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.त्यानंतर आरोपीने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर मुळ फिर्यादी पिडितेतर्फे अॅड. शशि कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला. तसेच सरकारी वकील अॅड. दत्ता पवार यांनी आरोपीने थंड डोक्याने लुटमार करण्याच्या उद्देशाने शारिरिक अत्याचार करुन कसा गुन्हा केला.ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सदर बाबींचा विचार सत्र न्यायालायाने सदर तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला.

 

सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे ॲड. दत्ता पवार आरोपीतर्फे ॲड. संजय चव्हाण तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. देवदत्त बोरगांवकर, ॲड. स्वप्निल सरवदे, ॲड. रणजीत चौधरी, ॲड. आशुतोष पुरवंत, ॲड. प्रसाद अग्निहोत्री यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ अपंग महिलेचा विनयभंग करून अंध आईस मारहाण; दोघा विरुद्ध गुन्हा

 

सोलापूर – उसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय अपंग महिलेचा विनयभंग करून त्यांच्या अंध आईस ढकलून देऊन जखमी केल्याची घटना गौडगाव (ता.बार्शी) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

या प्रकरणात वैरागच्या पोलिसांनी मारुती सोमनाथ शिंदे आणि त्याची पत्नी उज्वला शिंदे (दोघे रा. गौडगाव) यांच्याविरुद्ध विनयभंग आणि अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात अपंग पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून मारुती शिंदे आणि त्याची पत्नी या दोघांनी काल सकाळी अपंग महिलेस मारहाण करून पतीने तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्यावेळी पीडित महिलेच्या दृष्टीहीन आई या भांडण सोडवण्यात आल्या असता दोघांनी त्यांना दगडावर ढकलून दिले. त्यात डोक्यास मार लागून त्या जखमी झाल्या. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार पाडोळे करीत आहेत.

 

□ विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह चौघा विरुद्ध गुन्हा

 

सोलापूर – चारित्र्याच्या संशय आणि आमच्या घरात राहायचे नाही या कारणावरून सासरी छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चळे (ता. पंढरपूर) येथे रविवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास घडली.

 

आरती नवनाथ शिखरे (वय २१ रा.चळे) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती नवनाथ शिखरे, सासू जनाबाई शिखरे,धनाजी शिखरे(दीर),आणि त्याची पत्नी उज्वला धनाजी शिखरे (सर्व रा.चळे) या चौघाविरुद्ध पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरती शिखरे हिने रविवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या संदर्भात आशा बालाजी कांबळे (रा.कासेगाव रोड, पंढरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. पुढील तपास सहायक निरीक्षक ओलेकर करीत आहेत.

Tags: #Robbery #money #jewels #oppressing #married #Solapur #court #rejectsbail #youth#सोलापूर #विवाहिता #अत्याचार #पैसे #दागिन्यांची #लुट #तरुण #जामीन #फेटाळला #न्यायालय
Previous Post

मुलीवर केले दुष्कर्म, पीडितेच्या मैत्रिणीचाही विनयभंग; आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

Next Post

कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात

कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697