सोलापूर – एका मुलीवर दुष्कर्म केल्याच्या ऑरोपावरुन दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय ३८) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ठोठावली. Girl was raped, victim’s girlfriend was also molested; Three years of hard labor for the accused Solapur
नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीने पीडितेच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिला मदतीसाठी घरात बोलाविले व तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर त्याने तिला तू जर सदरची घटना कोणास सांगितली तर तुझ्यावर चोरीचा आळ घेईन, अशी धमकी दिली. आरोपीच्या धमकीस घाबरुन पीडितेने घटना तिच्या घरी कोणालाही सांगितली नाही. परंतू तिने ही घटना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला सांगितली.
त्यानंतर मे २०१६ मध्ये आरोपीने पीडितेच्या मैत्रिणीचा विनयभंग केला. त्यावेळी पीडितेच्या मैत्रिणीने स्वतःसोबत घडलेली घटना तसेच पीडितेवर झालेल्या अत्याचाराबाबत स्वतःच्या व पीडितेच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेवून याबाबत विचारणा केली असता तिने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची घटना आईला सांगितली. घटनेबाबत आईला माहिती मिळाल्यानंतर तिने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबत तसेच पीडितेच्या मैत्रिणीच्या झालेल्या विनयभंगाबाबत फिर्याद दिली. त्या फिर्यादीचा तपास होवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार व बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी न्यायालयात चौकशीदरम्यान पीडितेची मैत्रीण फितूर झाली. तरीही पीडिता व इतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस धमकी दिल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ८ प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
दंडातील पाच हजार रुपये पीडितेस नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यात सरकारतर्फे ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.