¤ आणखी दोनशे वर्ष ही इमारत भक्कमपणे दिमाखात उभी राहील !
¤ संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित यांना विश्वास !
सोलापूर : महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 110 वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामामुळे गतवैभव बरोबरच गतवैभवाबरोबरच बळकटीकरण ही झाले आहे. Solapur | Renovation of Indrabhuvan along with its past glory strengthens the two hundred year old building solidly architect. यामुळे आणखी दोनशे वर्ष ही इमारत भक्कमपणे दिमाखात राहील, असा विश्वास संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी व्यक्त केला आहे.
110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 5.13 कोटीच्या निधीतून नुतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या दहा महिन्यापासून हे इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनी मार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारागीर यासाठी परिश्रम घेतले आहेत.
महापालिका आवारातील इंद्रभुवन या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ध्वजारोहण सोहळा या इमारतीसमोरच करण्यात येणार आहे. यामुळे उर्वरित छोटी छोटी कामे पूर्ण करण्यात येत आहेत. त्याची पाहणी नवी दिल्ली येथील संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित व शर्मिला अशोकन यांनी केली. राहिलेली कामे व इतर आवश्यक त्या सूचना संबंधित कामगारांना त्यांनी दिल्या. दरम्यान, या इमारती संदर्भात संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली.
संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित म्हणाले की, नूतनीकरणाच्या कामामुळे इंद्रभुवन या इमारतीला गतवैभव प्राप्त झाले आहे. ही इमारत अधिक भक्कम झाली आहे. या इमारतीचे छत बदलले आहे. आवश्यक तिथे डागडुजीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने या इमारतीला गतवैभव प्राप्त करून देण्यात आले आहे. या कामामुळे ही इमारत अधिक सक्षम झाली आहे. यामुळे आणखी दोनशे वर्ष भक्कमपणे ही इंद्रभवन वास्तू दिमाखात उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
• बाहेरील बाजूस हायड्रोलिक लिफ्ट बसविणार
या इमारतीतील जुनी लिफ्टही काढण्यात आली आहे. त्याऐवजी मागील बाजूस हायड्रोलिक लिफ्ट बसविण्यात येत आहे. जेणेकरून या लिफ्टचा कोणताही वजन अथवा इतर गोष्टीची इमारतीला बाधा येणार नाही.
• मागील बाजूस नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था
दरम्यान, इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूच्या आवारात नागरिकांना बसण्यासाठी फरशीकरण करून व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हिरवळीचा हरित पट्टाही तयार करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी सांगितले.
या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठीची अंतर्गत फर्निचर व इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत.मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे.
या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेले छायाचित्रही लावण्यात येणार आहेत तसेच पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय राहणार आहे.
》 महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक वास्तववादी राहणार : आयुक्त तेली – उगले
□ थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्यावर प्रशासनाचा भर
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तयारी सुरू आहे. याबाबत बैठकही पार पडली आहे. यंदाचे अंदाजपत्रक हे वास्तववादी राहील. वाढीपेक्षाही थकीत कर वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाकडून यंदाच्या अंदाजपत्रक तयारीसाठी लगबग सुरू आहे. यासाठी नुकतीच एक बैठकही घेण्यात आली आहे. थकीत वसुली करण्यात येत असताना खर्च मात्र जैसे ते आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची थकबाकी त्याचबरोबर चालू कर असे दोन्ही मिळून ३० टक्के वसुलीचे प्रमाण आहे. तर चालू कर वसुलीमध्ये ८८ टक्के वसुली करण्यात यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडून या थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे.
दरम्यान, यंदाचा महापालिकेचे अंदाजपत्रक हे वास्तववादी राहील. यंदाचा अंदाजपत्रके वास्तववादी करण्याचा प्रयत्नराहील. कोणत्याही वाढीपेक्षा थकबाकी वसुलीला प्रशासन प्राधान्य देणार आहे. दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी नवे स्त्रोत्र काही निर्माण करता येतील का? याचाही विचार करण्यात येत असल्याचेही आयुक्त उगले यांनी यावेळी सांगितले.
• रेडीरेकनर संदर्भात शासन आदेशामुळे वसुलीला ब्रेक
रेडीरेकनर दरासंदर्भात गाळे भाडे वसुलीला शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थगितीचे आदेश दिले आहेत. यामुळे सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळेही उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
• कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या
महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कामाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त तेली-उगले यांनी स्पष्ट केले.