सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या सहा फूट उंच व धिप्पाड अशा भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवले. महाराष्ट्र केसरी एवढ्याच भव्यरितीने आयोजित केलेल्या भीमा केसरी स्पर्धेकडे सिकंदर व महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सिकंदरने ही स्पर्धा जिंकत अखेर बाजी मारली. Sinkdar Sheikh became ‘Bhima Kesari’, a procession was taken out in Mohol Solapur Pandharpur Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर सिंकदर शेख चर्चेत आला होता. त्याच्यावर अन्याय झाल्याचा अनेकांनी सूर ओढला होता. त्यानंतर त्याच्या मोहोळ गावात सत्कार करण्यात आला आहे. सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी कुस्तीच्या फडात मैदान मारलं आहे. पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा आजनाला ला पराभूत करून महेंद्र गायकवाड याने वाहतूक केसरीचा ‘किताब पटकवला. सिकंदर शेखने पंजाब केसरी भूपेंद्र सींग आजनाळ चारीमुड्या चित पट करीत भीमा केसरीचा किताब पटकवला.
या सामन्यापूर्वी बोलताना सिंकदर शेख भावूक झाल्याच पाहायला मिळालं. जरी मी महाराष्ट्र केसरी हरलो असलो तरी सर्वांच्या मनातला मीच महाराष्ट्र केसरी अशी प्रतिक्रिया सिकंदर शेखने दिली.
खासदार धनंजय महाडिक यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 1 लाख रूपयांची ही स्पर्धा भरवण्यात आली होती. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदर शेख खूप चर्चेत आला होता. दरम्यान, मोहोळ तालुक्याचा पैलवान सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंगविरूद्धचा डाव 2 मिनिटांत संपवून कुस्ती जिंकली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर कोल्हापूर सांगली या भागातून जवळपास 500 पैलवान आले असून कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या.
□ सिकंदर शेखची मिरवणूक
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ग्रामदैवताचे दर्शन घेत शहारातून सिकंदर शेखची मिरवणूक काढण्यात आली. सिकंदरच्या नागरी सत्कारासाठी शेकडो मोहोळकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी ओपन जीपमधून सिकंदरची रॅली काढण्यात आली. सिकंदर शेखने मोहोळ सह सोलापूरचे नाव देशभरामध्ये केले आहे. त्यामुळे लोकांच्यात एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळत होता.
केवळ महाराष्ट्र केसरीच नव्हे, तर देशभरातील विविध कुस्त्यांमध्ये सिकंदरची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सिकंदर शेख याने सुध्दा नागरी सत्कारानंतर ग्रामस्थांचे आभार मानले. “मोहोळमध्ये अनेक मल्लं तयार होत आहेत. पुढच्या काळात त्यांना देखील मार्गदर्शन करणार आहे. मागील पंधरा वर्षापासून मी पैलवानकीसाठी अपार कष्ट घेत आहे. त्यानंतर मला आज हे यश मिळालेलं आहे. मात्र असं असलं तरी मला अजून खूप काम करायचे आहे. एवढ्यावर थांबून चालणार नाही, असं मत सिकंदर शेखने व्यक्त केलं.
“मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन”
– सिकंदर शेख