Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत

Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy

Surajya Digital by Surajya Digital
January 25, 2023
in Hot News, शिवार, सोलापूर
0
कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग

□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील

सोलापूर – सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.  Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर… तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी सुभाष कागदे यांच्या शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून जमीनीचा कस आणि आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत.

■ संशोधनाची किमया

 

माळशिरस तालुक्यातील दसूर या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी एक एकरमध्ये त्यांनी रासायनिक खत टाकून गहू लावला. त्याला अद्याप लोंब्या आल्या नाही आणि वाढही झाली नाही तर चार एकर मध्ये ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या खताचा वापर केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एकाच दिवशी लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत वापरलेला गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहायला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही. डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय.

अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.

 

कर्करोग मुक्त भारत करणे हा मुलभूत संकल्प करून डॉ. ए.एस चन्नीवाला यांनी अनेक वर्षाच्या अथक संशोधनातून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. हे खत पिकास वापरल्या नंतर शेतकऱ्यांना युरिया, डि ए.पी पाण्यात विरघळणारे एन पी के,सुक्ष्म अन्नद्रव्ये,सल्फेट खते किंवा कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज पडत नाही.

 

आपले पिक चांगल्या किमतीत विकायचे असेल किंवा रोगमुक्त राहायचे असेल तर हे खत योग्य आहे.मी चार एकर मध्ये हे खत वापरले आहे. फरक दिसून आला आहे.लवकरच गहू तयार होवून खाण्यासाठी वापर करणार असल्याचे सुभाष कागदे
(शेतकरी ,दसूर ता. माळशिरस) यांनी सांगितले.

 

Tags: #Scientist #lost #loved #ones #cancer #discovers #organic #fertilizer #Malshiras #Research #Alchemy#कॅन्सर #माणसं #गमावलेल्या #शास्त्रज्ञ #शोधले #सेंद्रीयखत #माळशिरस #संशोधन #किमया
Previous Post

Bhima Kesari सिंकदर शेख ठरला ‘भीमा केसरी’, मोहो॓ळमध्ये काढली मिरवणूक

Next Post

पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697