□ ‘झाला कहर, पांडुरंग सावर’ घोषणेने पांडुरंगाला साकडे
पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घालून “झाला कहर पांडुरंग सावर” या घोषणेने २६ जानेवारी रोजी येथील ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर सांगोला रोड पंढरपूर येथून शेतकऱ्यांचे जनजागरण करण्यासाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये २ फेब्रुवारीपर्यंत जनजागरण सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. Public awareness week campaign of farmers organization from Pandhari Pandharpur Solapur Satara Kolhapur Sangli Pune Raghunath Patil
यावेळी शिवाजीराव नांदखिले, रामभाऊ सारवडे, संभाजी पवार, पांडुरंग मारवाडकर, सुनील बिराजदार, रघुनाथ शितोळे, नामदेव जानकर,बाळासाहेब वाळके यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
सदरची अभियान २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, महाराष्ट्रावर लागलेली शेतकरी आत्महत्येचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेतकरी संघटना कार्यरत आहे. सामान्य जनतेच्या शोषणाची गती वाढल्याने गरिब हा गरीबच राहिला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. धन दांडग्यांना कच्चा माल लागत असल्याने शेतमालावर निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शेतमालाला उत्पादन खर्चाच्या अर्धे पैसे हमीभाव म्हणून मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याला दोन्हीही सरकारचे धोरण कारणीभूत आहे. सरकार बदलून चालणार नाही. शेतकऱ्यांबाबतचे धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, की देशात धार्मिक भावना व इतर विषयांवर मोठा उद्रेक पाहावयास मिळतो, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्ष गप्प आहेत. देशात अब्जाधीश उद्योगपतींचे प्रमाण वाढले आहे. परंतु बेरोजगारी, भूकबळी, गरिबी आदी कारणाने देश मागे चालला आहे. यामुळे सर्वत्र कहर माजला असल्याने आम्ही “झाला कहर पांडुरंगा सावर”अशी घोषणा देऊन पांडुरंगाला शेतकरी संघटनेच्या वतीने साकड घालून २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पंढरपूरसह, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या भागातील शेतकऱ्यांची जनजागृती करणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.