पंढरपूर – दि पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेच्या नूतन अध्यक्षपदी सतीश दादासाहेब मुळे यांची तर उपाध्यक्षपदी माधुरी अभय जोशी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. Satish Mule as Chairman of Pandharpur Urban Bank; Election of Madhuri Joshi as Vice President
पंढरपूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मंगळवारी बँकेच्या प्रशासकीय भवनामध्ये सहाय्यक निबंधक पी.सी.दुरगुडे यांच्या उपस्थितीमध्ये बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडी जाहीर करण्यात आल्या. अध्यक्ष पदासाठी मुळे तर उपाध्यक्ष पदासाठी जोशी यांचे एक – एकच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान त्यापूर्वी संचालक मंडळाची बँकेचे मार्गदर्शक प्रशांत परिचारक व युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये अध्यक्षपद कोणास द्यायचे यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्वच संचालकांनी प्रशांत परिचारक यांना पदाधिकारी निवडीचे अधिकार दिले. चर्चेअंती सतीश मुळे व माधुरी जोशी यांची एक वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड करण्याचा निर्णय परिचारक यांनी जाहीर केला. निवडी नंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्याची अतिषबाजी करीत आनंद साजरा केला.
याप्रसंगी बँकेचे नूतन संचालक राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, ऋषिकेश उत्पात, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, व्यंकटेश कौलवार, डॉ.संगिता पाटील, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ निष्ठेला न्याय मिळतो
सतीश मुळे हे यापूर्वी चार वेळा पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच दोन वर्षे नगराध्यक्ष देखील होते. तीस वर्षाहून अधिक काळापासून ते परिचारक गटाचे निष्ठावंत आहेत. बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना मुळे यांनी, पांडुरंग परिवारामध्ये जातीला, पैश्याला किंवा तुमच्या पाठीमागे कितीजण आहेत याला महत्व नाही तर निष्ठेला महत्व असल्याचे आज पुन्हा एकदा सिध्द झाले असल्याचे म्हटले. स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे माझ्यावर प्रेम होते तर संपूर्ण परिचारक परिवाराचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत असताना मुळे यांचा कंठ दाटून आला होता.
》 गाईच्या पोटात सापडले तब्बल अडीच किलो प्लास्टिक
पिलीव : तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. त्यातून गाईच्या पोटातून तब्बल अडीच किलो प्लास्टिक काढण्यात यश आले.
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील दुध उत्पादक शेतकरी शोभा देशमुख यांच्या गाईला वारंवार पोटफुगीचा त्रास होत होता. यामुळे पोटफुगी, रवंथ करणे अवघड जात होते, तसेच गाईला ताप येत होता. महागड्या गाईच्या या आजाराने मालक चिंतेत होत्या. उपचार केल्यापुरते गाई बरी व्हायची व परत त्रास सुरु होत होता.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेंडगे, डॉक्टर मुल्ला, खाजगी डाँक्टर साठे यांचा सल्ला घेतला यावेळी डॉक्टरांनी गाईच्या पोटात लोखंड किंवा प्लास्टिक असेल असे डॉक्टरांनी सांगितले. व यासाठी गाईचे आपरेशन करावे लागेल असा सल्ला दिला होता. त्यानंतर पिलीवचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शेंडगे, शिंगोर्णीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुल्ला, डॉक्टर साठे व पुजारी या डॉक्टरांच्या टिमने तिन तास सदर गाईची शस्त्रक्रिया केली असता गाईच्या पोटातून तब्बल अडीच किलो प्लास्टिक व अर्धा किलो लोखंडी तार आढळून आली.
यामुळे सदर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन महागड्या गाईचा जिव वाचवला व होणारे आर्थिक नुकसान टाळले. याबद्दल देशमुख कुटुंबीयांनी या सर्व डॉक्टरांच्या टिमचे आभार मानले.