सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. उजनीचा उजवा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. Right canal of Ujani dam burst, damage to agriculture Patkul Mohol Solapur
उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पुराची स्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब, ऊसासह इतर पिके वाहून गेली आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरले.
मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे उजनी कॅनॉल फुटल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. उजनी धरणाचा डावा कालवा फुटून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील खरात वस्तीजवळ हा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी दिसून येत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कालव्याचे पाणी थेट शेतात गेल्यामुळे परिसरातील ऊस द्राक्ष तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात असलेल्या विहिरींमध्ये देखील गाळ भरला गेला असल्याने विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप पर्यंत समजले नाही.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या ऊस द्राक्ष तसेच डाळिंब पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची घरे शेतात आहेत त्या शेतकऱ्यांच्या घरात गुडघ्याभर पाणी गेल्याने घरांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे डाळिंब, ऊस इतर पिके वाहून गेल्याने हातातोंडाशी आलेली पिकेच गेली आहेत. पाटकुल गावाजवळील कॅनलला भगदाड पडल्याने हा प्रकार घडला आहे.
अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. ऊस शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचल आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.