सोलापूर – वेगाने जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॉलीतील महिलांसह १५ जण जखमी झाले. हा अपघात मोहोळ येथील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (ता.31) सकाळच्या सुमारास घडला. जखमी मधील सर्व ऊसतोड कामगार असून ते मोहोळ ते टेंभुर्णी असा प्रवास करीत होते. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. Mohol: Fifteen people, including a woman in a trolley, were injured after a tractor overturned
रीना वाण्या पाडवी (वय २५) तिचे चार मुले निशा, ज्योती, जितू आणि शर्मिला. सुमित्रा भारत वडवी (वय ३०), तिची मुलगी सेमिना. फुनती गुनीया पाडवी (वय ३०), हेमल पाडवी (वय २५),सुनिता पाडवी (वय २२), हिरा वडवी (वय २५)आणि अन्य चार लहान मुले सर्व रा. खानबरा जि.नंदुरबार)अशी जखमींची नावे आहेत. त्यांना वाण्या पाडवी यांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
》 सोलापूरच्या बेपत्ता तरूणाचा मृतदेह सिकंदराबाद येथे आढळला
सोलापूर : तीन दिवसांपूर्वी सोलापुरातून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह हैदराबादजवळील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनजवळ सापडला आहे. इरफान युसुफ शेख (वय २६, रा. शोभादेवीनगर, नई जिंदगी, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी तो घरातून अचानक कोणालाही न सांगता निघून गेला होता. नातेवाईक त्याचा तीन दिवस शोध घेत होते. एमआयडीसी पोलिसातही हरवल्याची प्राथमिक नोंद केली होती. मंगळवारी रात्री नऊच्या सुमाराला सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.
तसेच एमआयडीसी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेख यांचे नातेवाईक सिकंदराबादकडे रवाना झाले आहेत. शेख हा सिकंदराबादला का गेला. रेल्वेच्या धडकेत मरण पावला की कसे याची अद्याप चौकशी सुरू आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. मी सोलापूरच्या अमुक पत्त्यावर राहणारा आहे आणि मला घरापर्यंत पोहोचवा, असे त्यात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत शेख हा विवाहित असून त्याला दोन जुळी मुले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 शहरात सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जड वाहतूक पूर्णपणे बंद
○ पोलीस आयुक्तालयात निर्णायक बैठक
सोलापूर : शहरातून ये-जा करणाऱ्या जड वाहनांवर आता पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. पोलिस आयुक्त डॉ.राजेंद्र माने यांच्या निर्णयानुसार सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जड वाहतूक पूर्णपणे बंद राहील. जुना पूना नाका ते निराळे वस्ती येथून जाणारी जड वाहतूक आता कायमस्वरूपी बंद राहील. जड वाहनांचा वेग ताशी २० किमीचा असावा, उसाच्या ट्रॅक्टरला एकच ट्रॉली असेल, असे निकष ठरवून दिले आहेत.
शहरातील जड वाहतूक अनेकांच्या जिवावर बेतली असून चार दिवसांत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली. तर काहींनी महापालिका, पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांच्या दारात नगरला जाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी पहिली बैठक घेतली.
त्यानंतर जड वाहतुकीसंदर्भात रातोरात नवी नियमावली तयार करून मंगळवारी महापालिका, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, राज सलगर, आतिश बनसोडे, सोहन लोंढे, जुबेर बागवान, सुहास कदम, शाम कदम, सोमनाथ राऊत, शोएब चौधरी, शरद गुमटे, अक्षय अंजिखाने, सुरज पाटील, बाबा निशाणदार, अरविंद शेळके, तेजस गायकवाड यांच्यासह सोलापूर विकास संघर्ष समितीचे निमंत्रक उपस्थित होते.
● वाहतूक नवे नियम
– सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जड वाहतूक पूर्णत: बंद; रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत परवानगी
– जुना पूना नाका ते निराळे वस्ती येथून जड वाहतूक कायमस्वरूपी बंद
– जुना पूना नाका येथे महापालिका, पोलिस व आरटीओ प्रशासनातर्फे ‘हाईट ब्रेकर’ बसवण्यात येणार
– सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हाया अण्णाभाऊ साठे चौक येथील जड वाहतूक बंद
– शहरातील दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी येणाऱ्या माल वाहनांसाठी दुपारी एक ते चारपर्यंत मुभा
– जड वाहने शहरातून ये-जा करताना त्या वाहनांचा वेग ताशी २० किलोमीटर एवढाच असणे बंधनकारक
– शहरातील १९ सिग्नलपैकी ७ सिग्नल चालू असून बंद असलेले सिग्नल तत्काळ चालू करण्याचे आदेश