Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Union Budget बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

Important announcements for farmers in the budget

Surajya Digital by Surajya Digital
February 1, 2023
in Hot News, देश - विदेश, शिवार
0
Union Budget बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ अर्थसंकल्पामध्ये सात महत्वाच्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे

 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज संसदेत अर्थसंकल्प (बजेट 2023) सादर करण्यात आला. मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प असून लोकसभेच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. Important announcements for farmers in the budget

 

या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तरुण उद्योजकांना अग्रस्थानी ठेवून कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. सदर निधी हा आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये सरकारकडून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठीचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

भारतात बाजरीचे उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने भारत हा बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तृणधान्यासाठीदेखील ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. भारतीयांच्या आहारात जे पारंपरिक पदार्थ असतात त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिवळून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हॉर्टिकल्चरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2200 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कापसासाठीदेखील क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.

2023 च्या आर्थिक वर्षामध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य हे 11.1 ने वाढवून 20 लाख कोटी रुपये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बचत गटांच्या सक्षमीकरणावर देखील सरकारकडून भर देण्यात येणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय या क्षेत्राला कर्ज देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. तर मत्स्यपालन व्यवसायासाठी 60 हजार कोटी रुपये नवीन सवलतीची घोषणा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमताही वाढवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.

 

● अर्थसंकल्प – तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार?

 

3 लाखांपर्यंत उत्पन्न – कोणताही कर नाही

3 ते 6 लाख उत्पन्न – 5 टक्के कर

6 ते 9 लाख उत्पन्न – 10 टक्के कर

9 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर

12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर

15 लाखांहून जास्त उत्पन्न – 30 टक्के कर

□ अर्थसंकल्प – मोबाईलसह या वस्तू स्वस्त होणार !

 

– मोबाईल पार्ट्सच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करणार

– बॅटरीजवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव

– मोबाईल, एलएडी टीव्ही, इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार

-बॅटरीवर चालणाऱ्या व इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या
मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात

– कस्टम ड्युटी 21 पासून 13 टक्क्यांपर्यंत खाली आणणार

Tags: #Important #announcements #farmers #budget #UnionBudget #farmer's#बजेट #शेतकरी #महत्त्वपूर्ण #घोषणा #अर्थसंकल्प #शेती #निर्मलासितारमण
Previous Post

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Next Post

मोहोळ : ट्रॅक्टर उलटून ट्रॉलीतील महिलासह पंधराजण जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मोहोळ : ट्रॅक्टर उलटून ट्रॉलीतील महिलासह पंधराजण जखमी

मोहोळ : ट्रॅक्टर उलटून ट्रॉलीतील महिलासह पंधराजण जखमी

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697