Saturday, December 9, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बाळे खंडोबा मंदिराचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

Bale Khandoba temple dispute in District Collector's Court Patil Dhepe Solapur

Surajya Digital by Surajya Digital
February 2, 2023
in Hot News, सोलापूर
0
बाळे खंडोबा मंदिराचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
0
SHARES
177
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● चेअरमन – सचिवाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी

 

सोलापूर : बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदीर बाळे येथील ट्रस्टीमधला वाद विकोपाला गेला आहे. चेअरमन विनय ढेपे आणि सचिव सागर पुजारी हे बेकायदा कारभार तब्बल दोन कोटीचा घोटाळा केला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. Bale Khandoba temple dispute in District Collector’s Court Patil Dhepe Solapur तसेच त्यांच्या कारभाराची चौकशी करुन योग्य कारवाई करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ही बाळे मंदिरातील पुजारी आणि मानकऱ्यांनी केली आहे.

 

श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदिरात गेल्या चार वर्षापासून विनय ढेपे आणि सागर पुजारी काम पाहत आहेत. त्यांची मोठी दहशत मंदिरातील कर्मचाऱ्यांवर आहे. यातून मंदिराचा बेकायदा ताबा घेऊन मनमानी कारभार करत आहेत. कोट्यावधी रूपयाचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे.

 

वास्तविक पाहता सन २०१८ पासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे चेअरमन व विश्वस्त मंडळ स्थापन करणेबाबतचा चेंज रिपोर्ट सादर केलेला नाही. त्यामुळे ते अद्याप ही अधिकृतपणे चेअरमन अथवा सचिव नाहीत तसेच दादागिरी आणि दमदाटी करुन मंदीर समितीचा कब्जा घेतला आहे. तसेच न्यायालयाचा आदेश असताना ही रोख रक्कम तीन दिवसात बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना ही मंडळी मंदीराचा पैसा परस्पर खर्ची घालत आहेत. त्यामुळे श्री खंडोबा देवस्थान बाळेचे अधिकृत चेअरमन सिद्राम पुजारी आणि बाळकृष्ण पुजारी यांनी संबधितांना वकिलामार्फत जाहिर नोटीस दिलेली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

 

तसेच ट्रस्टच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर कोणाला ही अदा करु नये अशी लेखी सूचना केली असताना ही या बँक खात्यातून रक्कम काढली जात असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी किशोर पाटील, सुनिल पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील, बाळकृष्ण मोकाशी, सुभाष डांगे, मारुती तोडकर, मदन क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुरेश तोडकरी, बाबाराज शेख, सुनील भोसले, ओंकार कुलकर्णी, अक्षय हैनाळ, वैभव गुरव, अशोक पुजारी यांनी केली आहे.

 

□ मी अधिकृत चेअरमन : ढेपे

 

मी देवस्थानचा अधिकृत चेअरमन आहे. धार्मधायकडे सर्व रिपोर्ट सादर आहेत. मंदिराच्या विकासाठी अन्नछत्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ५१ लाखांची जागा ५१ लाखांमध्ये खरेदी केली आहे. विरोधाला विरोध म्हणून विरोधक आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत मंदिर आणि पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान करत आहेत.

 

आजपर्यंत मंदिर प्रशासन आणि मानकरी यांच्यात कोणता वाद नव्हता. मात्र गेली चार ते पाच वर्ष झाले व्यवस्थापनाचे व्यवहार वर्तणूक बेजबादर उध्दट आणि व्यवहार संशयास्पद झाल्याने मतभेद निर्माण झाले आहेत. मानकरी स्वार्थी नाहीत तर सेवेकरी आहेत. पुजारी आणि मोकाशी अडमावचे मंदिराचे अधिकृत पुजारी आहेत. त्यामुळे सिध्दा पुजारी अधिकृत चेअरमन आहेत. ढेपे यांचे पूर्वज येवती तालुक्यातील माढे येथील असल्याने त्यांचा बाळे देवस्थानवर पुजारीपणाचा हक्क नाही.

 

– किशोर पाटील (मुख्य मानकरी देवस्थान )

 

Tags: #Bale #Khandoba #temple #dispute #District #Collector's #Court #Patil #Dhepe #Solapur#सोलापूर #खंडोबा #मंदिर #वाद #जिल्हाधिकारी #कोर्ट #पाटील #ढेपे
Previous Post

सोलापूर | व्यापाराचे घर फोडून 45 लाखांच्या नोटा केल्या लंपास

Next Post

पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल

पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल

Latest News

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

by Surajya Digital
December 6, 2023
0

...

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

by Surajya Digital
December 4, 2023
0

...

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

by Surajya Digital
December 3, 2023
0

...

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

by Surajya Digital
November 28, 2023
0

...

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

by Surajya Digital
November 25, 2023
0

...

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

by Surajya Digital
November 24, 2023
0

...

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

by Surajya Digital
November 23, 2023
0

...

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

by Surajya Digital
November 22, 2023
0

...

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

मोबाईल कंपनीच्या अभियंत्याला मागितली पन्नास हजाराची खंडणी

सूरत-चेन्नई महामार्ग; अंतिम नोटीसीची मुदत संपली, पोलीस बंदोबस्तात सक्तीने ताबा

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© Website Design by Digital Buffalo - 9028927697