□ शेजबाभळगावच्या शशिकांत पुदेंची किमया
सोलापूर / शिवाजी हळणवर : जिल्ह्यातील मोहोळ सारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरली आहे. ती ही सेंद्रिय खताच्या वापरावर ….वाटले ना आश्चर्य… पण खरंय. वाचा सोलापूरची शेतक-याची सक्सेस स्टोरी. ‘Cashew’ of Konkan The first successful cashew orchard in West Maharashtra Mohol Shejbabhalgaon on the outskirts of Solapur
काजुची बाग केवळ समुद्र किनारी आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या भागातच पाहवयास मिळते. पण मोहोळ तालुक्यातील शेजबाभळगाव येथील उद्यानपंडीत असणाऱ्या शेतकऱ्याने दीड एकरामध्ये ही किमया केली आहे. अथक परिश्रम आणि योग्य नियोजन यावरच बाग मोठ्या डोलाने बहरत आहे. दीड एकरातील १४० झाडापासून दोन ते तीन लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरी पडत आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामुळे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकरी ऊस शेती करतात. ऊसाबरोबर द्राक्ष, डाळिंब, केळी यासारख्या नगदी फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे तर पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांचा भर हा पारंपरिक पिकावरच राहिलेला आहे. काळाच्या ओघात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे पण पुदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिली काजू लागवड करून ते यशस्वी उत्पादन घेत आहेत.
कोकणातून वेंगुर्ला ४ वेंगुर्ला ७ या जातीची काजूची रोपे आणून त्याची लागवड केली होती. सुरवातीस कमी काजू उत्पादन मिळाले परंतु तीन वर्षानंतर एका झाडापासून १० किलो काजू मिळत असून १ किलो काजू ९०० रूपये या दराने विक्री केली जात आहे. कोणतीही प्रक्रिया न करता ही काजू पैलवान व बागेस भेट देणाऱ्यासह बाजार विकली जातात. काजुच्या झाडांची वाढ होण्यासाठी दमट हवामान अनुकूल असले तरी मोहोळ भागातही काजु उत्तमरित्या बहरतात हे दाखवून दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
केवळ काजूच नाही तर त्यांच्या शेतामध्ये आंबा,चिक्कू,नारळ पेरु, दालचिनी सह मसाल्याची पिके अशी एक ना अनेक झाडे आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी अथक परीश्रम करीत तळहाताच्या फोडाप्रमाणे झाडांची जोपासना केली आहे.
काजूच्या शेतीला अधिकचे पाणी लागते असे नाही. केवळ नियमित वेळी जेमतेम पाणी दिल्यास बहरते. पाण्याबरोबरच वर्षातून दोन वेळा फवारणी ही व शेणखताच्या वापरावर केला जातो. बागेसाठी सुपिक जमीन आणि मुबलक पाणी असावे लागते हा येथील शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला आहे. उलट निचरा होणारी किंवा खडकाळ जमिनीवरच काजुची बाग बहरत असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य चांगले ठेवायचे असेल सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचा सल्ला ही शेतकऱ्यांना दिला आहे.
○ काजू कल्पवृक्ष
काजूचे झाड हे कल्पवृक्ष असून याच्या ‘गराचा’ उपयोग खाण्यासाठी ड्रायफ्रूट म्हणून केला जातो तर टरफलापासून तेल काढून त्याचा उपयोग सागवानी दरवाज्यांना कलर दिला जातो आणि बोंडापासून ‘फेणी’ बनविले जाते त्याचा उपयोग ‘किडणी’ सारख्या आजारावर केला जातो.
ही बाग केवळ सेंद्रिय खताचा वापर करून करीत आहे. यासाठी मी ११ खिलार गाईंचे संगोपन केले असून त्यांच्या शेणखत व गोमुत्र याच्या वापर करीत आहे. माझ्या कडे २८ जातीचे आंबे आहेत तर सुपारी,फणस, जायफळ, काळीमिरी, दालचिनी व मसाल्याच्या सर्व झाडांची लागवड केली असून राज्य सरकारने याची दखल घेऊन मला ‘उद्यानपंडित’ हा पुरस्कार ही दिला असल्याचे शशिकांत पुदे (शेजबाभळगाव ता. मोहोळ) यांनी सांगितले.